चार दिवसातच केळगाव प्रकल्प ओव्हरफ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:02 IST2021-08-21T04:02:12+5:302021-08-21T04:02:12+5:30
परिसरात सतत चार दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे केळना नदीला पूर येऊन केळगाव प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. या ...

चार दिवसातच केळगाव प्रकल्प ओव्हरफ्लो
परिसरात सतत चार दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे केळना नदीला पूर येऊन केळगाव प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. या धरणातून सिल्लोड तालुक्यातील-कोल्हाळा तांडा, सिरसाळा तांडा, जंजाळा, पांगरी, सासुरवाडा, हट्टी, वडाळा, बोजगाव, रेलगाव वाडी, मोढा खुर्द, मोढा बुद्रुक, गोळेगाव खुर्द, गोळेगाव बुद्रुक, गव्हाली, जीवरग टाकळी, तांडा बाजार, रहेमाबाद, असडी, पिंपळगाव पेठ, मोहळ, बोरगाव सारवणी, वरुड पिप्री, डोंगरगाव, सावखेडा खुर्द, बनकीनिळा, देऊळगाव बाजार, वांगी खुर्द, हळदा, टकला, मादनी, सारोळा, धोतरा, वडोद चाथा, म्हसला, खंडाळा, गेवराई सेमी, पिरोळा, चिंचवन, धावडा, तळवाडा, पळशी, पालोद, सोनापावाडी, पानवदोड, अंभई, अजिंठा, शिवना अशा सुमारे ४० गावांची तहान भागविली जाते. या धरणावर जिल्हा परिषदेंतर्गत अंभई व जांभई येथे दोन जलशुद्धीकरण केंद्र आहेत. जोरदार पावसामुळे हे धरण गुरुवारी ओव्हरफ्लो झाले असून, सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
फोटो :
200821\img_20210820_131716.jpg
केळगाव धरण भरले असून सांडव्यावरुन असे पाणी वाहत आहे.