अभ्यासात सातत्य ठेवा; बारकाईने वृत्तपत्रांचे वाचन करा
By Admin | Updated: May 26, 2015 00:49 IST2015-05-26T00:24:31+5:302015-05-26T00:49:57+5:30
औरंगाबाद : स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी नियमित बारकाईने वृत्तपत्रांचे वाचन करावे आणि वाचन केलेल्या बातम्यांचा अभ्यासक्रमासाठी संबंध जोडावा.

अभ्यासात सातत्य ठेवा; बारकाईने वृत्तपत्रांचे वाचन करा
औरंगाबाद : स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी नियमित बारकाईने वृत्तपत्रांचे वाचन करावे आणि वाचन केलेल्या बातम्यांचा अभ्यासक्रमासाठी संबंध जोडावा. अभ्यास मन लावून करताना सातत्यही ठेवावे, असा सल्ला डॉ. अभिजित भांगडिया यांनी दिला.
युवा नेक्स्ट व द युनिक अकॅडमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यूपीएससी आणि एमपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी आणि स्पर्धा परीक्षांमधील करिअरची संधी या विषयांवर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी द युनिक अकॅडमीचे कपिल हंडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
शहरात ‘संदूक’ची टीम प्रमोशनसाठी आली असताना टीमने लोकमत कार्यालयास भेट देऊन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व करिअर संधी या कार्यक्रमात भेट दिली. चित्रपटावर विद्यार्थ्यांसोबत मनसोक्त गप्पा मारल्या.
४यावेळी चित्रपटात मुख्य भूमिकेत असणाऱ्या सुमित राघवन आणि भार्गवी चिरमुले यांच्यासह दिग्दर्शक अतुल काळे, आशिष रायकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.