केबीसीच्या चव्हाणला आणणार

By Admin | Updated: June 5, 2016 00:45 IST2016-06-05T00:10:38+5:302016-06-05T00:45:01+5:30

केबीसी कंपनीचा प्रमुख भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती चव्हाण या दाम्पत्याला औरंगाबाद पोलिसांच्या पाहुणचाराला सामोरे जावे लागणार आहे.

KBC to Chavan | केबीसीच्या चव्हाणला आणणार

केबीसीच्या चव्हाणला आणणार

औरंगाबाद : अल्पावधीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून औरंगाबादसह राज्यातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणारा केबीसी कंपनीचा प्रमुख भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती चव्हाण या दाम्पत्याला औरंगाबाद पोलिसांच्या पाहुणचाराला सामोरे जावे लागणार आहे. तो सध्या नाशिक मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या विरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जवाहरनगर पोलिसांनी त्याच्या अटकेची तयारी पूर्ण केली आहे.
केबीसी कंपनीने राज्यभरात नेमलेल्या शेकडो एंजटांमार्फत हजारो नागरिकांनी अल्पावधीत गुंतवलेल्या रकमेच्या अडीच पट परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. या आमिषाला बळी पडून हजारो लोकांनी केबीसीमध्ये गुंतवणूक केली. विशेष म्हणजे केबीसीमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगणाऱ्या एजंटस्नी आपल्याजवळच्या नातेवाईक आणि मित्रांनाच बळीचा बकरा बनविले होते. केबीसीचा प्रमुख भाऊसाहेब चव्हाण, आरती चव्हाण यांच्यासह संचालकांविरोधात गतवर्षी राज्यभरात विविध ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. गुन्हे दाखल होण्यापूर्वीच चव्हाण दाम्पत्य सिंगापूरला पळून गेले होते.

Web Title: KBC to Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.