शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीत कन्नड मतदारसंघ कोणाला? वाटाघाटीत भाजपचा दावा, मोठ्या नेत्याची मुलगी लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 12:19 IST

महायुतीत कन्नड मतदारसंघ शिंदेसेनेकडे जाण्याची चर्चा; वाटाघाटीत भाजपने केला दावा

छत्रपती संभाजीनगर : भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व मित्र पक्षांसह असलेल्या महायुतीच्या जागा वाटप होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन जागा भाजपकडे आहेत. पाच जागा शिंदेसेनेकडे आहेत. तर एक जागा उद्धवसेनेकडे आहे. भाजपने मतदारसंघ वाटाघाटीत कन्नड मतदारसंघावर दावा केला आहे. महायुतीमध्ये कन्नड हा मतदारसंघ कुणाकडेच नाही. कारण तेथे उद्धवसेनेचे वर्चस्व आहे. जिल्ह्यातील पाच मतदारसंघ शिंदेसेनेने लढावेत, तर चार मतदारसंघ भाजपने लढावेत, यासाठी भाजपचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे.

कन्नडमध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात काम केले आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी त्या मतदारसंघात सर्वाधिक जास्त कामे केली आहेत. त्यामुळे भाजपला तो मतदारसंघ मिळावा, अशी अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपची फरपट झाली. विधानसभा निवडणुकीत तसा प्रकार होऊ नये, यासाठी भाजपने आत्तापासूनच कन्नडसाठी जोर लावण्यास सुरुवात केली आहे.

कन्नडवर शिंदेसेनेचा दावाकन्नडची जागा शिंदेसेनेकडे जाणार असून तेथे भाजपच्या एका नेत्याच्या मुलीला निवडणूक मैदानात आणण्याची तयारी असल्याची चर्चा भाजप वर्तुळात सुरू झाल्यामुळे तेथील पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे जिल्ह्यात एक तरी मतदारसंघ पक्षाला वाढीव मिळावा. आणि तो मतदारसंघ कन्नड असावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील नेत्यांकडे सुरू केली आहे. कन्नडमध्ये शिंदेसेनेचे नेटवर्क अपुरे तर भाजपचे नेटवर्क तळागाळापर्यंत असल्याने पक्षाने मतदारसंघ मागणीसाठी आघाडी घेतली आहे.

भाजपला एक मतदारसंघ वाढीव पाहिजेजिल्ह्यात भाजपच्या फक्त तीन जागा आहेत. त्यामुळे आणखी एक जागा पक्षाला मिळावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कन्नडची जागा महायुतीमध्ये कोणाकडेही नाही. त्यामुळे ती जागा भाजपला मिळावी, यासाठी तेथील पदाधिकारी, कार्यकर्ते मागणी करीत आहेत. जर महायुतीच्या वाटाघाटीत ती जागा शिंदेसेनेकडे गेली तर भाजपला दुसरा मतदारसंघ मिळावा, जेणेकरून भाजप तीन ऐवजी किमान चार जागांवर विधानसभा उमेदवार देईल.-शिरीष बोराळकर, शहर-जिल्हाध्यक्ष भाजप

जिल्ह्यातील पक्षीय बलाबल असे...भाजप: ३ (औरंगाबाद पूर्व, फुलंब्री, गंगापूर)शिंदेसेना: ५ (औरंगाबाद मध्य, पश्चिम, वैजापूर, पैठण, सिल्लोड)उद्धवसेना : १ (कन्नड)

काँग्रेस: ००राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार: ००राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार: ००

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kannad-acकन्नडBJPभाजपाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक