कन्नडचा कारभार खुलताबाद बीडीओंकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:05 IST2021-06-29T04:05:21+5:302021-06-29T04:05:21+5:30

औरंगाबाद : कन्नड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) श्रीकृष्ण वेणीकर यांच्यावर अकार्यक्षमतेचा आरोप करून त्यांना कार्यमुक्त करण्याची मागणी केली. ...

Kannada administration to Khultabad BDs | कन्नडचा कारभार खुलताबाद बीडीओंकडे

कन्नडचा कारभार खुलताबाद बीडीओंकडे

औरंगाबाद : कन्नड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) श्रीकृष्ण वेणीकर यांच्यावर अकार्यक्षमतेचा आरोप करून त्यांना कार्यमुक्त करण्याची मागणी केली. पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यात वेणीकर कारवाईआधीच अर्जित रजेवर गेल्याने त्यांचा पदभार खुलताबाद येथील गटविकास अधिकारी पी. एन. सुरडकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

खा. डाॅ. भागवत कराड यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांची भेट घेत वेणीकर यांना हटवण्याची मागणी केली होती. पंचायत समितीच्या सदस्यांनीही त्यांच्या विरोधात मोट बांधत गटविकास अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे गुरांचे गोठे, विहिरी, पानंद रस्त्याची कामे खोळंबल्याचा आरोप करून कामांना गती देण्याची मागणी शिष्टमंडळाने सीईओंकडे केली होती. त्यावर डाॅ. गोंदावले यांनी वेणीकर यांना दिलेला टास्क पूर्ण केला की नाही, याची पडताळणी करून त्यांच्यावर आठवडाभरात कारवाईचा इशारा दिला होता. तोच २२ जूनला वेणीकर यांनी अर्जित रजेचा अर्ज केला. त्यानुसार २३ जूनपासून कन्नड गटविकास अधिकाऱ्यांचा पदभार पुढील आदेशापर्यंत खुलताबादच्या बीडीओंकडे सीईओ डाॅ. गोंदावले यांनी सोपवला.

Web Title: Kannada administration to Khultabad BDs