‘सिमरन’चा उल्लेख होताच कंगनाची सटकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:02 IST2021-02-05T04:02:11+5:302021-02-05T04:02:11+5:30
दिग्दर्शक हंसल मेहता ‘मी ज्याप्रमाणे अरविंदला पाठिंबा दिला होता त्याच विश्वासाने मी अण्णा हजारे यांचे समर्थन केले होते. अर्थात ...

‘सिमरन’चा उल्लेख होताच कंगनाची सटकली
दिग्दर्शक हंसल मेहता ‘मी ज्याप्रमाणे अरविंदला पाठिंबा दिला होता त्याच विश्वासाने मी अण्णा हजारे यांचे समर्थन केले होते. अर्थात मला याचे दु:ख नाही. कारण आपण सगळेच चुका करतो. मीसुद्धा ‘सिमरन’सिनेमा केला होता, असे ट्विट केले होते. सिमरन चित्रपटात कंगना असल्याने अपेक्षेप्रमाणे तिने यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘चांगले आहे सर. मी तुमच्या पाठीशी उभी राहिली आणि आता तुम्ही असे बोलताय. जणू मी ‘अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का...’ गातेय असे वाटतेय,’ असे ट्विट कंगनाने केले आहे. यावर हंसल मेहता यांनी मी केलेले याआधीचे ट्विट तुझ्यासाठी नव्हते, असे स्पष्टीकरण दिले.
भरतच्या अंकुशला हटके शुभेच्छा
आज भरत जाधव आणि अंकुश चौधरी प्रसिद्ध अभिनेते आहेत. या दोघांची मैत्री चित्रपटसृष्टीत येण्याआधीपासून आहे. अंकुशचा काल वाढदिवस होता. या निमित्ताने आपल्या लाडक्या मित्राला शुभेच्छा देताना भरतने अंकुश आणि त्याचा एक जुना फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो जवळजवळ २०-२५ वर्षांपूर्वीचा असावा. फोटोत त्यांना ओळखणे देखील कठीण जात आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोला खूप सारे लाईक्स मिळाले असून यावर दोघांचेही चाहते भरभरून कमेंट देखील करत आहेत. तसेच भरतने अंकुशसोबतचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
प्रणाली भालेराव झळकणार वेब सिरीजमध्ये
‘टकाटक’ या मराठी चित्रपटातून अभिनेत्री प्रणाली भालेराव हिला खूप लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने बोल्ड सीन दिले होते. त्यामुळे ती खूप चर्चेत आली होती. आता ती बॉलिवूड अभिनेता आर्य बब्बरसोबत काम करताना दिसणार आहे. ही एक वेबसिरिज आहे आणि या सिरिजचे सध्या शूटिंग सुरू आहे. नुकतेच तिने तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सोशल मीडियावर सांगितले आहे. ती आर्य बब्बरसोबत एका हिंदी वेबसिरिजमध्ये दिसणार आहे. या सिरिजचे शूटिंग सध्या सुरू आहे. तिने शूटिंगदरम्यान आर्य बब्बरसोबतचे सेटवरील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.