काळवटी धरणाची उंची वाढणार

By Admin | Updated: July 15, 2016 01:03 IST2016-07-15T00:10:35+5:302016-07-15T01:03:58+5:30

अंबाजोगाई : शहराची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने विशेष बाब म्हणून काळवटी साठवण तलावाची उंची वाढविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली

Kalvati dam height will increase | काळवटी धरणाची उंची वाढणार

काळवटी धरणाची उंची वाढणार


अंबाजोगाई : शहराची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने विशेष बाब म्हणून काळवटी साठवण तलावाची उंची वाढविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याची माहिती आ. संगीता ठोंबरे यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.
राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाचे उपसचिव प्र. गो. मांदाडे, यांनी काही अटीच्या अधिन राहून मंगळवारी या तलावाची उंची वाढविणण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे पत्रही काढले आहे. याबाबत आ. ठोंबरे म्हणाल्या की, २०१४ च्या हिवाळी अधिवशेनात आपण हा प्रश्न मांडला होता. त्यानंतर २०१५-१६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात व मंत्रालयातील प्रधान सचिवांपर्यंत या प्रश्नाची गरज लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र शासनाच्या नवीन धोरणामुळे या प्रकल्पाची उंची वाढविता येणार नाही. या सबबीखाली अनेकवेळा हा प्रस्ताव फेटाळण्यात आला तरीही आपली भूमिका कायम ठेवत पालकमंत्री पंकजा मुंडे, खा. प्रितम मुंडे यांच्या सहकार्याने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात बैठक घेतली. त्यात अंबाजोगाईकरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज व आवश्यकता त्यांच्यासमोर मांडली. अटी व शर्तींवर प्रधान सचिवांनी धरणाची उंची वाढविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. (वार्ताहर)

Web Title: Kalvati dam height will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.