शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
5
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
6
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
7
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
8
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
9
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
10
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
11
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
12
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
13
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
14
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
15
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
16
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
17
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
18
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
19
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
20
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...

कळंबला चोराखळीतून पाणी

By admin | Updated: April 14, 2016 01:03 IST

कळंब : शहराला चोराखळी धरणातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिल्यामुळे मागील अनेक दिवसांपासून तीव्र

कळंब : शहराला चोराखळी धरणातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिल्यामुळे मागील अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या कळंबकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षा मिराताई चोंदे व नगरसेवकांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन २५ टँकरची मागणी केली होती. यानंतर हा निर्णय घेण्यात आला.मांजरा धरण कोरडेठाक पडल्यानंतर कळंब शहराचा पाणीप्रश्न तीव्र बनला आहे. सध्या शहरात दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, जिल्हा प्रशासनाने शहर परिसरातील सहा किमी अंतरातूनच पाणी साठविण्याचे निर्देश पालिकेला दिले होते. त्यामुळे परिसरातील स्त्रोत शोधताना पालिकेची दमछाक झाली. या स्त्रोतातूनही मुबलक पाणी उपलब्ध होत नसल्याने त्याचा परिणाम टँकरच्या खेपांवर झाला. पर्यायाने नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजनही कोलमडून शहरवासियांना कधी विकतच्या पाण्यावर तर कधी विंधन विहिरीच्या पाण्यावर तहान भागविण्याची वेळ आली. शहरात सध्या लोकसहभागातून घेतलेल्या काही विंधन विहिरींवर तसेच काही नागरिकांनीपुढाकार घेऊन उपलब्ध करून दिलेल्या विंधन विहिरीवरून थोडाफार पाणीपुरवठा होतो आहे. नगर परिषद काही ठराविक भागात पाणीपुरवठा करीत असून, दग नगर, कल्पना नगर, बाबाा नगर, पुनर्वसन सावरगाव या भागात नागरिकांची पाण्यासाठी मोठी धावपळ होताना दिसते. शासकीय कार्यालये असलेल्या भागातही पाण्यासाठी नागरिकांनी दिवस-रात्र एक केली आहे. लोकसहभागातून कामे होत असल्याने पालिकाही स्वत:हून काही विंधन विहिरी घेईल, अशी अपेक्षा होती. परंतु, विशेष सभेत मंजूर करून घेतलेल्या १९ विंधन विहरिीबाबत त्यांच्याकडून काहीच कार्यवाही होत नसल्याचे चित्र आहे. याच अनुषंगाने आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांची भेट घेतली. यावेळी कळंब शहराचे स्थानिक पाणी स्त्रोत कमी पडत असल्यामुळे चोराखळी येथील तलावातून पाणी द्यावे व २२ हजार लिटर क्षमतेचे २५ टँकर सुरू करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. २५ टँकरच्या रोज दोन खेपा गृहीत धरल्यास कळंब शहर व डिकसळच्या मिळून ४० हजार लोकसंख्येस दर मानसी प्रतीदिन ३० लिटर याप्रमाणे पाणीपुरवठा होवू शकतो, ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पालिका मुख्याधिकारी, पाणीपुरवठा विभाग प्रमुख व उपविभागीय अधिकारी यांना चोराखळी येथे जावून स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले. तसेच अहवाल मिळाल्यानंतर तात्क़ाळ वीस हजार लिटर क्षमतेच्या दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासनही दिले. दरम्यान, रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाने वीस टँकर मंजूर केले अूसन, यामुळे शहराची पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात नगराध्यक्षा मिराताई चोंदे, उपनगराध्यक्ष मुश्ताक कुरेशी, नगरसेवक पांडुरंग कुंभार, श्रीधर भवर, संजय मुंदडा, अतुल कवडे, वनमाला वाघमारे, अतिया सलिम शेख, अनिता लोमटे, मुख्याधिकारी सुंदर बोंदर, पाणीपुरवठा विभाग प्रमुख जगन्नाथ बावळे आदींचा समावेश होता.