ज्योती मुकाडे, मयुरी पवार महाराष्ट्राच्या खो-खो संघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 23:03 IST2017-11-29T23:01:44+5:302017-11-29T23:03:05+5:30

मध्यप्रदेशातील उमराई येथे होणाºया राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी धर्मवीर संभाजी विद्यालयाच्या ज्योती मुकाडे आणि मयुरी पवार यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.

 Jyoti Mukade, Mayuri Pawar, in the Kho-Kho team of Maharashtra | ज्योती मुकाडे, मयुरी पवार महाराष्ट्राच्या खो-खो संघात

ज्योती मुकाडे, मयुरी पवार महाराष्ट्राच्या खो-खो संघात

औरंगाबाद : मध्यप्रदेशातील उमराई येथे होणाºया राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी धर्मवीर संभाजी विद्यालयाच्या ज्योती मुकाडे आणि मयुरी पवार यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. ज्योती मुकाडे व मयुरी पवार यांच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर धर्मवीर संभाजी विद्यालयाने बीड येथील राज्यस्तरीय स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला होता. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सचिव श्यामसुंदर नाईक, उपाध्यक्ष देवजीभाई पटेल, मुख्याध्यापक अशोक मोरे, पर्यवेक्षक शिवदास गिरे, क्रीडा शिक्षक विनायक राऊत, अविनाश शेंगुळे यांनी ज्योती आणि मयुरी यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title:  Jyoti Mukade, Mayuri Pawar, in the Kho-Kho team of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.