शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात पाणीपट्टीची केवळ २ टक्केच वसुली

By admin | Updated: December 30, 2014 01:07 IST

जालना : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा कराची थकबाकी ७ कोटींवर पोहोचली असून मागील काळात वसुली केवळ २ टक्केच झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

जालना : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा कराची थकबाकी ७ कोटींवर पोहोचली असून मागील काळात वसुली केवळ २ टक्केच झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वसुली पथकातील १० कर्मचाऱ्यांना मुख्याधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. चार लाख लोकसंख्येच्या या शहरात सुमारे १८ हजार अधिकृत जोडण्या आहेत. परंतु मालमत्ता कराबरोबरच पाणीपट्टी कराची थकबाकीही वाढत गेली. २०१२ च्या दुष्काळी परिस्थितीत काही नवीन भागात जलवाहिन्या अंथरण्यात आल्या. तेथे काहींनी अधिकृत जोडण्या केल्या. मात्र काही अनधिकृत जोडण्या आहेत. त्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यत आलेले आहे. गेल्या दीड वर्षांपासून जालना शहरासाठी जायकवाडी पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली. त्यासाठी दरमहा ४० लाखांच्या विद्युत देयकाचा भरणा पालिकेला करावा लागतो. परंतु पाणीपुरवठा कराची वसुली अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने या थकबाकीची रक्कम ७ कोटींवर पोहोचली. एकीकडे थकबाकीचे वाढते प्रमाण आणि दुसरीकडे शहरवासियांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी विद्युत देयकाची रक्कम भरताना पालिका प्रशासनाला करावी लागणारी कसरत यामुळे अनेकवेळा मोठा पेच निर्माण होत असे. (प्रतिनिधी)