टुल्सअभावी तीन तास बस एकाच जागी

By Admin | Updated: May 11, 2014 00:40 IST2014-05-11T00:33:49+5:302014-05-11T00:40:58+5:30

मोहन बोराडे , सेलू आठवडी बाजार व लग्नतिथी असताना पाथरी आगाराच्या तुघलकी कारभाराचा फटका सातोना-आष्टी कडे जाणार्‍या प्रवाशांना बसला़.

Just one place for three hours due to the absence of tools | टुल्सअभावी तीन तास बस एकाच जागी

टुल्सअभावी तीन तास बस एकाच जागी

 मोहन बोराडे , सेलू आठवडी बाजार व लग्नतिथी असताना पाथरी आगाराच्या तुघलकी कारभाराचा फटका सातोना-आष्टी कडे जाणार्‍या प्रवाशांना बसला़ पंक्चर काढण्यासाठी टुल्स व पान्हे या किरकोळ बाबी नसल्यामुळे शनिवारी एक बस तब्बल तीन तास सेलू बसस्थानकात एकाच ठिकाणी उभी होती़ सातोना-आष्टी ही बस सेलू बसस्थानकातून दुपारी १ वाजून ४५ मि़ निघणार होती़ परंतु बसचे एक टायर पंक्चर झाले. बसमधील टायर काढून पंक्चर काढण्यासाठी टुल्स नसल्याने बसमधील प्रवासी तीन तास एकाच ठिकाणी ताटकळले़ सेलू बसस्थानकातून आष्टीला चार फेर्‍या सोडल्या जातात़ शनिवारी (एमएच २०-०३७९) ही बस दुपारी १ वाजून ४५ वाजता बसस्थानकातून आष्टीकडे जाणार होती़ परंतु, एक टायर बस स्थानकात आल्यानंतर पंक्चर झाले़ टुल्स नसल्याने पाथरी आगारातून टुल्स येण्यासाठी चालक व वाहकांनी दोन तास वाट पाहिली़ विशेष म्हणजे, पाथरी आगाराच्या दुसर्‍या बसेस मध्येही टूल नव्हते. त्यामुळे आष्टी बसचे पंक्चर काढण्यासाठी तीन तास लागले़ संबंधित बसमध्ये पर्यायी टायर देखील नव्हते़ इतर बसेस मध्येही हीच अवस्था असल्याने प्रवाशांना भर उन्हात तीन तास बस सुटण्यासाठी वाट पहावी लागली़ काही तासाने पाथरी आगारातून दुसर्‍या बसमध्ये टुल्स आल्यानंतर पंक्चर काढण्यात आले़ परंतु तोपर्यंत पंक्चर काढण्याची साधी धडपडही कर्मचार्‍यांची दिसली नाही़ त्यामुळे आष्टी बसची एक फेरी कपात करण्यात आली़ दीड वाजता बसस्थानकात आलेल्या प्रवाशांना दुपारी ४ वाजून ४५ वाजता आष्टीकडे रवाना होता आले़ शनिवारी सेलूचा आठवडी बाजार असतो त्यातच लग्नसराई असल्यामुळे प्रवाशांची बसस्थानात गर्दी असते़ विशेष म्हणजे, वाहतूक नियंत्रण कक्षातही पर्यायी व्यवस्था म्हणून टूल उपलब्ध नाही़ गलथान कारभाराचा प्रवाशांना फटका पाथरी आगाराकडून सेलू बसस्थानकाला नेहमीच दुजाभावाची वागणूक दिली जाते़ आगारातून सेलूकडे बसेस उशिरा सोडणे, भंगार बसेस सेलूकडे पाठविणे हे नित्याचे झाले आहे़ पाथरी आगाराच्या बसेसमध्ये टूल्स, पर्यायी टायर उपलब्ध नाहीत त्यामुळे टायर पंक्चर झाल्यास फ ेर्‍यात कपात होते. परंतु प्रवाशांनाही नाहक त्रास सोसावा लागतो़ सेलू-आष्टी ही फ ेरी पाथरी आगाराला चांगले उत्पन्न देते, परंतू किरकोळ कारणावरून फ ेर्‍या रद्द करण्यात येतात़ आगारातील काही चालक, वाहक मनमानी करतात़ फेरीला उशीर झाला की दुसरी फ ेरी ते मनमानीने रद्दच करतात़ पाथरी आगाराच्या कारभाराविरूद्ध सेलूतील प्रवाशांचा संताप व्यक्त होत असून नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत़

Web Title: Just one place for three hours due to the absence of tools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.