जिल्ह्यात घरफोडी करणारी टोळी जेरबंद
By Admin | Updated: May 31, 2014 00:28 IST2014-05-31T00:01:46+5:302014-05-31T00:28:37+5:30
नांदेड : नांदेड जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या करणारी अट्टल गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली आहे़

जिल्ह्यात घरफोडी करणारी टोळी जेरबंद
नांदेड : नांदेड जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या करणारी अट्टल गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली आहे़ त्यांच्याकडून २२३ ग्रॅम सोने व इतर साहित्य मिळून तब्बल पावणेआठ लाखांचा माल जप्त केला आहे़ जिल्ह्यात घरफोड्या करणार्यांनाचा शोध घेण्याच्या सुचना विशेष पोलिस महानिरीक्षक जगन्नाथ यांनी दिल्या होत्या़ त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीधर पवार यांनी विशेष पथक स्थापन केले होते़ या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे घरफोडी करणार्यांची टोळी पकडली़ संजय पंडीतराव नामनूर राग़ुंडलवाडी ताक़ळमनुरी, सय्यद शायद सय्यद जाफर रा़महेबुबनगर, सय्यद अतिक सय्यद चांदपाशा, शेख शफीक ऊर्फ बिल्डर शेख मोहिन रा़नांदेड यांना शिताफीने पकडले़ या चोरट्यांनी भाग्यनगर, शिवाजीनगर, लोहा आदी ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली़ या घरफोडीतील २२३ ग्रॅम सोने, ५५ तोळे चांदीचे दागिने, लॅपटॉप, एक बुलेट, होंडा युनिकॉर्न, दोन स्प्लेंडर असा मिळून एकूण ७ लाख ८५ हजार ५६५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला़ त्यानंतर या आरोपींना स्थानिक पोलिस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले़ पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, सय्यद फहिम, पोहेकॉ बळीराम दासरे, बालाप्रसाद जाधव, देवीदास चव्हाण, बालाजी सातपुते, पिराजी गायकवाड, भानुदास वडजे, दिनानाथ शिंदे, बोंडलेवाड, रमाकांत शिंदे यांचा सहभाग होता़ (प्रतिनिधी)