शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

उत्कट, मधुर गायकीसह झंकारला सतारस्वर!

By admin | Updated: October 19, 2014 00:39 IST

औरंगाबाद : घरंदाज, संपन्न गायकी आणि मुग्ध करणाऱ्या सतार-तबल्याच्या जुगलबंदीचा मंतरलेला माहोल शनिवारी रसिकांनी अनुभवला.

औरंगाबाद : घरंदाज, संपन्न गायकी आणि मुग्ध करणाऱ्या सतार-तबल्याच्या जुगलबंदीचा मंतरलेला माहोल शनिवारी रसिकांनी अनुभवला. वाराणसीचे युवा कलावंत पं. नरेंद्र मिश्र यांचे सतारवादन आणि ख्यातनाम शास्त्रीय गायिका कल्पना झोकरकर यांच्या गायनाने कलेच्या अस्पर्शित क्षितिजांचे दर्शन श्रोत्यांना घडविले. दूरदर्शन व आकाशवाणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आकाशवाणी संगीत संमेलनाच्या ६१ व्या वर्षाच्या या कार्यक्रमात या दोन कलावंतांनी रंग भरला. पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह, सुशीला नेरळकर, आकाशवाणीचे सहायक संचालक सिद्धार्थ मेश्राम, कार्यक्रमाधिकारी उन्मेष वाळिंबे, वृत्तसंपादक रमेश जायभाये उपस्थित होते. मैफलीच्या पूर्वार्धात पं. मिश्र यांच्या बोलक्या सतारस्वरांनी वातावरणात रंग भरला. तबल्यावर पुंडलिक कृष्ण भागवत यांची जाणती साथसंगत होती. यावेळी राग जोग व मालकंस हे दोन रात्रकालीन राग त्यांनी सादर केले. पिलू रागातील ठुमरीने त्यांनी सांगता केली तेव्हा रसिकांची दाद आसमंतात घुमत होती. उत्तरार्धात कल्पना झोकरकर यांच्या संयत गायकीने श्रोत्यांना खिळवून ठेवले. त्यांनी सुरुवातीस राग बागेश्री व कलावती सादर केला. चमत्कृतीपूर्ण लयकारी आणि तानांच्या लडीची विलक्षण नजाकत उलगडत थाटात गायलेल्या टप्पा प्रकाराने सांगता केली. ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. नाथ नेरळकर यांचा यावेळी गौरव करण्यात आला. या हृद्य सत्काराने भारावून जात आकाशवाणीशी असलेले जुने ऋणानुबंध नेरळकर यांनी जागविले. संगीत संमेलनासाठी आकाशवाणी व दूरदर्शनने एकत्र येणे ही कोजागरी आहे अशी भावना व्यक्त करीत ते म्हणाले की, औरंगाबाद आकाशवाणीच्या उद्घाटनाच्या दिवशीच गाण्याचा बहुमान मला मिळाला होता. आता कुठे ऐंशी वर्षांचा झालोय! असेच सन्मान मिळत राहिले तर त्या ऊर्जेवर अजूनही दीर्घकाळ गात राहीन, अशी टिप्पणीही त्यांनी केली. नितीन देशपांडे व प्रियंवदा सावंत यांनी मैफलीचे नेटके निवेदन केले.