कारागृह पोलिसाच्या पत्नीने घेतले विष
By Admin | Updated: May 20, 2017 23:30 IST2017-05-20T23:28:43+5:302017-05-20T23:30:48+5:30
बीड : जिल्हा कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने शनिवारी सायंकाळी विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.

कारागृह पोलिसाच्या पत्नीने घेतले विष
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने शनिवारी सायंकाळी विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.
आरती किशोरसिंह ठाकूर असे त्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती किशोरसिंह ठाकूर हे जिल्हा कारागृहात कर्तव्यावर आहेत. पतीसोबत त्यांचा घरगुती कारणावरुन वाद झाला होता. त्यानंतर आरती यांनी विषारी द्रव प्राशन केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. दरम्यान, चार दिवसांपूर्वीच आरती यांनी पती किशोरसिंह हरवल्याची तक्रारी दिली होती. आरती यांचा रात्री उशिरापर्यंत जवाब नोंदविला नव्हता.