नोकरीचे आमिष; लाखोंची फसवणूक
By Admin | Updated: January 9, 2017 23:42 IST2017-01-09T23:38:46+5:302017-01-09T23:42:08+5:30
उस्मानाबाद : रेल्वे विभागात टीसीची नोकरी लावते, असे म्हणून एका इसमाची साडेचार लाख रूपयांना फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेविरूध्द उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नोकरीचे आमिष; लाखोंची फसवणूक
उस्मानाबाद : रेल्वे विभागात टीसीची नोकरी लावते, असे म्हणून एका इसमाची साडेचार लाख रूपयांना फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेविरूध्द उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना तालुक्यातील पोहनेर येथे घडली़
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पोहनेर येथील शंकर अर्जुन आडगळे यांना सन २०१४ मध्ये गावातीलच छायाबाई माणिक आडगळे यांनी रेल्वे विभागात टीसीची नोकरी लावते, असे आश्वासन देत काम करण्यासाठी पैशांची लागणी केली होती़ रेल्वेत टीसीची नोकरी मिळणार असल्याच्या आशेवर शंकर आडगळे यांनी छाया आडगळे यांना साडेचार लाख रूपये दिले़ मात्र, दोन-तीन वर्षे झाले तरी नोकरी मिळत नसल्याने शंकर आडगळे यांना पैशांची मागणी केली़ मात्र, पैसे परत देण्यास छायाबाई आडगळे यांनी टाळाटाळ केली़ नोकरीचे आमिष दाखवून छायाबाई आडगळे यांनी फसवणूक केल्याची फिर्याद शंकर आडगळे यांनी उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली़ आडगळे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि संभाजी पवार हे करीत आहेत़ दरम्यान, नोकरीचे अमिष दाखवून कोणी पैशांची मागणी करीत असेल तर अशा अमिषाला बळी पडू नका, असे प्रशासनाकडून वेळोवेळी आवाहन करूनही अशा घटना जिल्ह्यात समोर येत आहेत़ (प्रतिनिधी)