शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

जेहूरच्या दोघांसह तिघे जागीच ठार

By admin | Updated: December 13, 2014 00:30 IST

जेहूर : भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले, तर दोन जण जखमी झाले.

जेहूर : भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले, तर दोन जण जखमी झाले. हा अपघात नागपूर-मुंबई द्रुतगती मार्गावर कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारात शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास झाला़ मृतांमध्ये दोघे कन्नड तालुक्यातील जेहूरचे तर अन्य एक निफाड तालुक्यातील आहे.ज्ञानेश्वर रघुनाथ पारधे (वय ३५), कारभारी रावसाहेब रिंढे (वय ६०, दोघे रा़ जेहूर, ता़ कन्नड, जि़ औरंगाबाद) व राजेंद्र गणपतराव जगताप (वय ३०, रा़ तारूखेडले, ता़ निफाड, जि़ नाशिक) यांचा मृतांमध्ये समावेश आहे, तर माया राजेंद्र जगताप (वय ३०) व रेणुका नवनाथ कदम (वय १५, रा़ सुरेगाव, ता़ कोपरगाव) या दोघी जखमी झाल्या़ जखमींना शिर्डी येथील साईनाथ रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे़ पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जेहूर येथील ज्ञानेश्वर रघुनाथ पारधे व कारभारी रावसाहेब रिंढे हे (एम. एच. २०, एल.पी. २२७६) क्रमांकाच्या दुचाकीवरून वैजापूरहून कोपरगावच्या दिशेने येत होते़ त्याचवेळी तारूखेडले येथील राजेंद्र जगताप हे पत्नी माया जगताप व भाची रेणुका कदम हिला घेऊन श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथे नातलगाच्या वर्षश्राद्धसाठी कोपरगावहून वैजापूरच्या दिशेने जात होते़ दोघांच्याही दुचाकी भरधाव वेगाने नागपूर-मुंबई हायवेने कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारात असताना गणपती मंदिराजवळ ज्ञानेश्वर जगताप यांच्या वस्तीजवळ समोरासमोर धडकल्या़ दोन्ही दुचाकींचे हँडल एकमेकांत गुंतले गेले़ त्यामुळे ज्ञानेश्वर पारधे, कारभारी रिंढे व राजेंद्र जगताप हे जागीच ठार झाले, तर माया जगताप व रेणुका नवनाथ कदम या दोघी जखमी झाल्या़ सायंकाळी उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्याची प्रकिया सुरू होती. (वार्ताहर)