जेट एअरवेजचे विमान रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 23:45 IST2019-03-13T23:44:26+5:302019-03-13T23:45:01+5:30
अपघाताच्या घटनेमुळे ‘बोइंग ७३७ मॅक्स ८’ या विमानांचे उड्डाण रोखण्यात आले असताना बुधवारी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास येणारे जेट एअरवेजचे मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमान रद्द करण्यात आले. परिणामी प्रवाशांचे नियोजन विस्कळीत झाले.

जेट एअरवेजचे विमान रद्द
औरंगाबाद : अपघाताच्या घटनेमुळे ‘बोइंग ७३७ मॅक्स ८’ या विमानांचे उड्डाण रोखण्यात आले असताना बुधवारी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास येणारे जेट एअरवेजचे मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमान रद्द करण्यात आले. परिणामी प्रवाशांचे नियोजन विस्कळीत झाले.
इथोपियामध्ये रविवारी झालेल्या अपघातानंतर ‘बोइंग ७३७ मॅक्स ८’ ही विमाने उडविण्यासंबंधी कडक सूचना नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने कंपन्यांना दिल्या. या पार्श्वभूमीवर कंपन्यांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना बुधवारी जेट एअरवेजचे सायंकाळचे मुंबईचे विमान रद्द झाले. जेट एअरवेजचे मुंबई-औरंगाबाद विमान सायंकाळी ५.१५ वा. येते आणि ५.४५ वाजता मुंबईसाठी उड्डाण करते. हे विमान रद्द झाल्याची माहिती मिळताच काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. अनेक प्रवाशांचे औरंगाबादहून मुंबईला गेल्यानंतर तेथून अन्य विमानांचे नियोजन होते. त्यामुळे माहिती मिळाल्यानंतर ऐनवेळी काही प्रवाशांनी एअर इंडियाच्या विमानाने जाणे पसंत केले, तर काहींनी थेट प्रवासच रद्द केला. काही प्रवाशांनी गुरुवारच्या विमानाने जाण्याचे नियोजन केले.
याविषयी जेट एअरवेजच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आॅपरेशनल कारणामुळे विमान रद्द झाले. प्रवाशांची अन्य विमानात सोय केली. सर्वांना कालच माहिती देण्यात आली होती, असे सांगण्यात आले.
------------