शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
2
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
3
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं करण कळताच पती हादरला!
4
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
5
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
6
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
7
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
8
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
9
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
10
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
11
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
12
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
13
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
14
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
15
Mumbai: विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेची जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव
16
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
17
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
18
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
19
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
20
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे

जायकवाडीच्या डाव्या कालव्याची तब्बल ४० वर्षानंतर होणार दुरुस्ती; ७३५ कोटी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 19:19 IST

कालव्याच्या दुरुस्तीसाठी बीजीएम तंत्राचा वापर करणार; दुरुस्तीनंतर ५ टीएमसी पाण्याची बचत होणार

छत्रपती संभाजीनगर : परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या ३ जिल्ह्यांतील तब्बल १ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी शासनाने ७३५ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली. महिनाभरात या कामाच्या निविदा प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.

जायकवाडी प्रकल्पाच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. प्रकल्पापासून डावा आणि उजवा असे दोन कालवे आहेत. डावा कालवा २०८ किलोमीटर लांबीचा, तर उजवा कालवा १३० किमी लांबीचा आहे. डाव्या कालव्याची पाणी वहन क्षमता मोठ्या प्रमाणात घटल्याने या कालव्याची तातडीने दुरुस्ती करण्याचा अहवाल वर्ष २००५ मध्ये एका समितीने केलेल्या सर्वेक्षणानंतर शासनास दिला. मात्र, मागील २० वर्षांपासून या दुरुस्तीला मुहूर्त लागला नव्हता. डाव्या कालव्यासह मुख्य आणि उपवितरिकांना जागोजागी भगदाड पडले आहे. झाडेझुडपे उगवलेली आहेत. यामुळे डाव्या कालव्याची पाणी वहन क्षमता ४०टक्के घटली आहे. शिवाय सिंचन क्षमताही घटली आहे.

या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाच्या छत्रपती संभाजीनगर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने (कडा) जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासह उपवितरिकांच्या दुरस्तीसाठी शासनाला तब्बल ३२०० कोटी रुपयांच्या प्रस्ताव दिला होता. महाराष्ट्र सिंचन सुधारणा योजनेअंतर्गत (एमआयआयपी) जायकवाडी प्रकल्पाचा डाव्या कालव्यासाठी ७३५ कोटी रुपये मंजूर केले. आता केवळ मुख्य कालव्याची दुरुस्ती करण्यात येईल. या कामाच्या तांत्रिक निविदा तयार करण्यात आल्या असून, तपासणीसाठी नाशिक येथील राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्या. समितीने मंजुरी देताच महिनाभरात निविदा प्रक्रिया होणार असल्याचे मुख्य अभियंता जयंत गवळी यांनी सांगितले.

डाव्या कालव्याची लांबी -- २०८ किलोमीटरसिंचन क्षमता १ लाख ४० हजार हेक्टरकालव्याच्या दुरुस्तीसाठी बीजीएम तंत्राचा वापर करणारदुरुस्तीनंतर ५ टीएमसी पाण्याची बचत होणार

४० वर्षांत डाव्या कालव्याची दुरुस्ती२०८ किलोमीटर डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी शासनाने ७३५ कोटी रु. मंजूर केले. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासाठी प्रयत्न केले. मागील ४० वर्षांत डाव्या कालव्याची दुरुस्ती न झाल्याने वहन क्षमता घटली आहे. सध्या एका आवर्तनासाठी २५ ते ३० दिवसांचा कालावधी लागतो. हा कालावधी दुरुस्तीनंतर १७ ते २० दिवसांपर्यंत येईल.- जयंत गवळी, मुख्य अभियंता, जलसंपदा.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर