शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

जायकवाडी धरणाचे सलग चौथ्या वर्षी दरवाजे उघडले; १८ दरवाज्यातून होतोय विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 19:47 IST

जुलै महिन्यात दरवाजे उघडून विसर्ग करण्यात आल्याची मागील १५ वर्षातील ही दुसरी वेळ आहे.

औरंगाबाद: मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणाचे सलग चौथ्यावर्षी दरवाजे उघडण्यात आले आहेत. आज सायंकाळी सात वाजून २० मिनिटांना सुरुवातीला दोन दरवाजे उघडून गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. टप्याटप्प्याने एकूण १८ दरवाने अर्धा फुटाने उघडून तब्बल ९ हजार ४३२ क्युसेक विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

वरच्या भागात दमदार पाऊस झाल्याने पावसाळ्याच्या सुरुतीपासूनच जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर आवक सुरु आहे. सध्या ३६ हजार क्युसेक पाण्याची आवक धरणात सुरु आहे. तसेच आणखी जोरदार पावसाची शक्यता असल्याने आवक वाढत जाणारी आहे. दरम्यान, धरणाची पाणीपातळी आज दुपारी ९० टक्के झाली. तसेच पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असून, त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील नदी , नाल्यांद्वारे, जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत आहे. यामुळे आज सायंकाळी धरणातून विसर्ग करण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत आज सायं ७:१५ वाजता जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. सुरुवातील दोन आणि टप्प्याटप्प्याने तब्बल १८ दरवाजे अर्धा फुटाने उघडून तब्बल ९ हजार ४३२ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. जुलै महिन्यात दरवाजे उघडून विसर्ग करण्यात आल्याची मागील १५ वर्षातील ही दुसरी वेळ आहे. गोदावरी नदी काठच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना सतर्क राहणेबाबत प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. तसेच नदीपात्रात कुणीही जाऊ नये, पाळीव प्राणी, गुरेढोरे, विद्युत मोटारी तसेच इतर साहित्य इत्यादी तात्काळ काढून घेण्याचे आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सलग चौथ्यावर्षी करण्यात आला विसर्गमागील तीन वर्षांपासून नियमितपणे जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडावे लागत आहेत. यंदा जुलै महिन्यातच जायकवाडीचे दरवाजे उघडावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सन १९७६ साली जायकवाडी धरण बांधून पूर्ण झाले. साधारणत: १०५ टीएमसी पाणी साठविण्याची या धरणाची क्षमता आहे. धरणाला ४६ वर्षे झाल्यामुळे अनेक दुरुस्त्यांची कामे अद्याप झालेली नाहीत. ४६ वर्षांत सर्वाधिक वेळा दरवाजांचे ऑपरेशन होण्याचा योग २०१९ च्या पावसाळ्यात आला. धरण १०० टक्के भरल्यानंतर अंदाजे ५५ ते ६० टीएमसी पाण्याचा विसर्ग मागील तीन वर्षांत करण्यात आला. धरणावरील वीजनिर्मितीचे सर्व रेकॉर्ड २०१९-२०२० या काळात मोडले. गेल्या पावसाळ्यात धरणात एकूण क्षमतेच्या तुलनेत दीडपट पाणी आले. त्यातून पाण्याचा विसर्ग नियमित होत राहिला. सध्या जायकवाडी धरणातून जलविद्युत केंद्रातून १ हजार ५८९ क्युसेक, उजवा कालव्यातून ५०० क्युसेक आणि १८ मुख्य दरवाज्यातून ९ हजार ४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाRainपाऊस