शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरण @ ५४.२८ टक्के; पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसाने आवक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 12:19 IST

धरण निम्मे भरल्यामुळे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.

पैठण ( छत्रपती संभाजीनगर) : जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रातील नाशिक भागात झालेल्या जोरदार पावसामुळे सोमवारी सायंकाळपर्यंत या धरणाची पाणी पातळी ४९.८६ टक्क्यांवर पोहोचली होती. तर मंगळवारी सकाळी ८ वाजता पाणीपातळी ५४. २८ टक्क्यांवर गेली आहे. सध्या या धरणात ९३ हजार ३२८  क्युसेकने पाणी येत असल्याची माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली.

मागील वर्षापेक्षा यावर्षी दोन महिने अगोदर धरणात ५० टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये हे धरण निम्मे भरले होते. गेल्या वर्षी हे धरण पूर्ण पावसाळ्यात ५५ टक्के भरले होते. सोमवारी सकाळी दहा वाजता या धरणात ९६ हजार ३३८ क्युसेकने पाणी येत होते. मात्र दुपारनंतर आवक कमी होत ६६ हजार ६६६ क्युसेकवर आली.

दरम्यान, मंगळवारी सकाळी पुन्हा आवक वाढत जाऊन ९३ हजार ३२८  क्युसेकवर गेली आहे. सध्या धरणात जिवंत पाणीसाठा १७७८.४३१ दलघमी आहे. हे धरण निम्मे भरल्यामुळे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणRainपाऊसAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा