'जय श्रीराम'चा जयघोष

By Admin | Updated: April 16, 2016 01:37 IST2016-04-16T01:30:25+5:302016-04-16T01:37:46+5:30

नांदेड :श्रीराम नवमीनिमित्त श्री रामजन्मोत्सव समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या मिरवणूकीत लाखो भाविकांनी सहभाग नोंदविला़ रॅलीतील जय श्रीराम च्या जयघोषाने परिसर दुमदुमला

Jay Jholosh of 'Jai Shri Ram' | 'जय श्रीराम'चा जयघोष

'जय श्रीराम'चा जयघोष


नांदेड :श्रीराम नवमीनिमित्त श्री रामजन्मोत्सव समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या मिरवणूकीत लाखो भाविकांनी सहभाग नोंदविला़ रॅलीतील जय श्रीराम च्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता़ श्रीरामाची महती सांगणारे भजन अन् भक्तीगीतांवर हजारो भाविकांची एका तालात साथ लक्षवेधी ठरली़ रात्री अकरा वाजेपर्यंत सुरु असलेल्या या मिरवणुकीसाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता़
शहरातील गाडीपुरा येथील श्री हनुमान मंदिरात श्रीराम आरतीने मिरवणुकीस प्रारंभ झाला़ त्यासाठी सकाळपासूनच राम भक्तांचे जत्थे हनुमान मंदिर परिसरात जमत होते़ यानंतर रेणूकामाता मंदिर येथे आरती झाली़ त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली़ महावीर चौक, वजिराबाद मार्गे ही मिरवणुक निघाली होती़
दरम्यान, मिरवणुकीत भव्य १३ फुट उंचीच्या श्रीराम मुर्तीची भक्तांकडून ठिकठिकाणी आरती करण्यात आली़
रॅलीत लाखांवर भक्तांनी सहभाग नोंदवला़ मिरवणुकीत श्री गुरु गोविंदसिंघजी, महामानव डॉ़बाबासाहेब आंबेडकर, जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्यासह अनेक महापुरुषांचे तैलचित्र लावण्यात आली होती़ शहरभर भगव्या पताका व झेंडे लावण्यात आले होते़
जय श्रीरामच्या जल्लोषपूर्ण घोषणा देत हजारो तरूण रॅलीत सहभागी झाले होते़ राम-नामाची महती सांगणाऱ्या गीतांवर हजारो तरुण एका तालात टाळ्या वाजून साथ देत होते़ त्यामुळे वातावरण भक्तीमय झाले होते़ कलामंदिर मार्गे शिवाजीगर, श्रीनगर मार्गे ही मिरवणूक अशोकनगर येथील श्री हनुमान मंदिर येथे पोहोचली़ याठिकाणी रात्री उशिरा सामुहिक आरतीने मिरवणुक विसर्जित झाली़
दरम्यान, मिरवणुका जस-जशा पुढे जात होत्या़ त्या पाठीमागे स्वंयसेवकांचे एक पथक रस्त्यावर पडलेली पाणी पाऊच, कचरा उचलत होते़ तर काही तरुणांनी रस्ता सफाई करुन स्वच्छतेचा संदेश दिला़ (प्रतिनिधी)
मराठवाड्यातील दुष्काळस्थिती ठळकपणे उमटविणारा देखावा तयार करण्यात आला होता़ यामध्ये अत्यल्प पावसामुळे पडलेला दुष्काळ आणि त्यातून निर्माण झालेली भयावह परिस्थिती, पावसाअभावी वाळलेली झाडे़ त्यात सावकाराकडून चाललेली पिळवणुक आदीसह शेतकरी आत्महत्या यावर आधारीत देखाव्यानी सर्वांचे लक्ष वेधले़
४श्रीराम मंदिराची प्रतिकृती विद्युत रोषणाईसह उभारण्यात आली होती़ त्यापाठोपाठ हनुमानाची वानरसेना आणि श्रीराम राज दरबार होता़ यावेळी देखाव्यामध्ये श्रीराम, लक्ष्मण, सिता आणि हनुमान यांचा देखावा अधिक लक्ष वेधून घेत होता़ या भव्य रॅलीतील देखावे पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती़
४भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा देशभक्तीपर देखावा तयार केला होता़ याठिकाणी देशभक्तीपर गीते सुरू होती़ दरम्यान, ठिकठिकाणी मिरवणूकीत सहभागी भक्तांकरीता अन्नदान आणि पाणी वाटप करण्यात येत होते़

Web Title: Jay Jholosh of 'Jai Shri Ram'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.