जरंडी कोविड केंद्र ठरतेय गंभीर रुग्णांसाठी वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:05 IST2021-04-07T04:05:52+5:302021-04-07T04:05:52+5:30
सोयगाव : एक लाख तेरा हजार लोकसंख्या असलेल्या तालुक्यातील नागरिकांच्या ऑक्सिजनची व्यवस्था आता जरंडीकर करणार आहेत. तालुक्यात ज्यांना ऑक्सिजनची ...

जरंडी कोविड केंद्र ठरतेय गंभीर रुग्णांसाठी वरदान
सोयगाव : एक लाख तेरा हजार लोकसंख्या असलेल्या तालुक्यातील नागरिकांच्या ऑक्सिजनची व्यवस्था आता जरंडीकर करणार आहेत. तालुक्यात ज्यांना ऑक्सिजनची गरज भासणार आहे, त्याला आता जरंडी कोविड केंद्र जीवदान देणारे ठरणार आहे.
जरंडी कोविड केंद्रांत मध्यवर्ती ऑक्सिजन यंत्रणेचे पन्नास बेड मंजूर झाले आहेत. या कामांच्या पूर्वतयारीची पाहणी प्रवीण पांडे यांनी मंगळवारी केली. सोयगावसाठी मंजूर झालेली मध्यवर्ती ऑक्सिजन यंत्रणा आता जरंडीच्या कोविड केंद्राला मिळाली आहे. त्यामुळे जरंडी आता तालुक्यातील गरजू असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन पुरविणारे केंद्र ठरणार आहे.
अशी असेल रचना
दोन सिलेंडरद्वारा पन्नास बेडवर ओ-टू द्वारे रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्यात येणार आहे. यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्याला नियुक्त करण्यात येईल. नियंत्रक म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे हे असणार आहेत.