‘जार’ वॉटरच्या कारवाईला आली मरगळ

By Admin | Updated: May 14, 2014 01:06 IST2014-05-14T00:58:21+5:302014-05-14T01:06:22+5:30

लातूर : कोणत्याही चाचणीविना जार वॉटरची विक्री लातूर शहर व जिल्ह्यात जोरदारपणे सुरूच आहे़ जुजबी तपासणीचे सोंग करून कारवाई केल्याचे अन्न व औषधी प्रशासन भासवित आहे़

The 'jar' water action has come crashing down | ‘जार’ वॉटरच्या कारवाईला आली मरगळ

‘जार’ वॉटरच्या कारवाईला आली मरगळ

 लातूर : कोणत्याही चाचणीविना जार वॉटरची विक्री लातूर शहर व जिल्ह्यात जोरदारपणे सुरूच आहे़ जुजबी तपासणीचे सोंग करून कारवाई केल्याचे अन्न व औषधी प्रशासन भासवित आहे़ त्यामुळे जार वॉटरची विक्री जोमातच आहे़ ‘लोकमत’ने आरोग्याशी हानीकारक असणार्‍या या पाण्यासंदर्भात स्टिंग आॅपरेशनद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले़ मात्र अन्न व औषधी प्रशासनाचा वेळकाढूपणा जार वॉटर विक्रीला पोषक ठरत आहे़ लातूर जिल्ह्यात अनाधिकृतपणे जार वॉटरची विक्री करणारे जवळपास ३६ ते ४२ प्लांटधारक आहेत़ त्यांच्याकडे ना अन्न व औषधी विभागाचा परवाना ना स्थानिक संस्थेचा़ बीएसआय मानांकन तर दूरच़ शिवाय, पाण्याची कसलीही चाचणी न करता, शुद्धीकरण न करता, शास्त्रीय पद्धतीचा अवलंब न करता विक्री सुरूच आहे़ ‘लोकमत’ची मालिका सुरू झाल्यानंतर अन्न व औषधी प्रशासनाने कारवाईचे अधिकार नसल्याचे सांगून हात झटकले होते़ मात्र जिल्हाधिकारी डॉ़विपीन शर्मा यांनी पाण्याची कसलीही चाचणी न करता विक्री होत असेल आणि त्यांच्याकडे परवाना नसेल तर हा व्यवसाय अनाधिकृत व धोकादायक असल्याचे सांगून कारवाई करण्याचे लेखी आदेश अन्न व औषधी प्रशासनाला दिले होते़ त्यानंतर अन्न व औषधी प्रशासनाने उदगीर शहरात ७ व लातूर शहरातील २ प्लांटधारकांची तपासणी केली़ या तपासणीनंतर कसलीही कारवाई अन्न व औषधी प्रशासनाने केली नाही़ अन्न व औषधी प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांना या संदर्भात विचारले असता ते कधी औरंगाबादला कार्यशाळा तर कधी मुंबईला मिटींग असल्याचे सांगून वेळकाढूचे धोरण अवलंबत आहेत़ अन्न व औषधी निरिक्षक कारवाई चालू असल्याचे सांगत आहेत़ नेमके कारवाईचे गोडबंगाल अन्न व औषधी प्रशासनाकडून समजत नाहीत़ त्यामुळे आजही लातूर शहर व जिल्ह्यात जारद्वारे पाण्याची खुलेआम विक्री सुरूच आहे़ ‘लोकमत’ने या विषयावर प्रबोधन केल्यामुळे जनतेमध्ये जनजागृती झाली आहे़ त्यामुळे जार पाण्याची विक्री थंडावली आहे़ परंतु, प्लांटधारकाचा हा व्यवसाय सुरूच आहे़ केवळ अन्न व औषधी प्रशासनाचे या व्यवसाय धारकांना अभय मिळत असल्याने हा प्रकार चालू आहे़ (प्रतिनिधी) प्रशासन गप्प पाण्याचे शुद्धीकरण करून पॅकबंद पाण्याची विक्री करण्यासाठी किमान २२ चाचण्या घ्याव्या लागतात़ सुक्ष्मजीवशास्त्र व रसायनशास्त्राच्या पदवीधारक त्या प्लांटमध्ये केमिस्ट म्हणून कार्यरत असायला हवेत़ जलशुद्धीकरण केल्यानंतर पॅकबंद पाणी करून विक्री करण्यास कोणाचीही हरकत नाही़ परंतु, शुद्धीकरणही नाही आणि चाचण्याही नाहीत़

Web Title: The 'jar' water action has come crashing down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.