शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत ऑनलाईन फसवणुकीचे 'जामतारा' मॉडेल उद्धवस्त; १ हजार मोबाईल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 11:48 IST

डेहराडून पोलिसांची शहरात कारवाई : अनधिकृत कॉल सेंटरमधून तीन शिफ्टमध्ये चालत होते काम

औरंगाबाद : ऑनलाइन फसवणुकीसाठी देशभर बदनाम असलेल्या झारखंड राज्यातील जामतारा येथील मॉडेलनुसार ‘ऑनलाइन भारत पे’ ॲपद्वारे इन्स्टंट लोन घेणाऱ्याकडून पैसे वसूल करण्यासाठी देशभरात फसवणुकीचे जाळे निर्माण केलेले कॉल सेंटर बुधवारी रात्री उद्ध्वस्त करण्यात आले. ही कारवाई पैठण गेट परिसरातील यश इंटरप्राइजेस व संकल्प क्लासेस असलेल्या इमारतीत करण्यात आली. या कारवाईत १ हजारापेक्षा अधिक मोबाइल जप्त केले असून, दोन तलवारीही सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ऑनलाइन भारत पे ॲपद्वारे इन्स्टंट लोन दिल्यानंतर कर्जदारास शिवीगाळ करणे, धमक्या देणे, सोशल मीडियावर कर्जदारांचे छायाचित्रांचे मार्फिंग करून व्हायरल करण्याच्या प्रकारामुळे उत्तराखंडमधील डेहराडून शहरातील शेकडो नागरिक त्रस्त होते. ज्या मोबाइलवरून धमक्या देण्यात येत होत्या, त्याचे लोकेशन शहरातील पैठण गेट परिसरातील यश इंटरप्राइजेस व संकल्प क्लासेस असलेल्या इमारतीमध्ये दाखविण्यात येत होते. त्यामुळे डेहाराडून सायबर पोलिस निरीक्षकांचे एक पथक बुधवारी शहरात दाखल झाले. या पथकाने पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची भेट घेऊन फसवणुकीची माहिती दिली.

तेव्हा डॉ. गुप्ता यांनी पथकाच्या मदतीसाठी गुन्हे शाखा, सायबर आणि क्रांती चौक पोलिसांचे पथक दिले. त्यानुसार यश इंटरप्राइजेस या इमारतीमध्ये छापा मारल्यानंतर त्या ठिकाणी दोन मजल्यांवरील खोल्यांमध्ये कॉल सेंटरमध्ये काम करणारी २०० पेक्षा अधिक तरुण मुले फोनवर फक्त शिवीगाळ करताना आढळून आली. त्याशिवाय सिल्लेखाना चौकातील संकल्प क्लासेसच्या इमारतीमधील दोन हॉल, एका खोलीतही तरुणांना प्रशिक्षण देण्यात येत होते. दोन्ही ठिकाणच्या छाप्यात तब्बल १ हजारापेक्षा अधिक मोबाईल पोलिसांना सापडले. त्यातील डेहराडूनशी संबंधित ३२ पैकी २३ सिमकार्ड, ५ मोबाइल डेहराडून पोलिसांनी जप्त केले. उर्वरित गाेरखधंद्यावर कोणत्या कलमानुसार कारवाई करायची याचा खल आयुक्तालयात दिवसभर सुरू होता. हे सेंटर चालविणाऱ्या मालकाच्या कार्यालयात दोन तलवारीही सापडल्याचे सूत्रांनी सांगितले.

१२ तासांपेक्षा अधिक वेळ कारवाईडेहराडून पोलिसांसह शहर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर जप्त केलेल्या मोबाइल, तलवारींचे पंचनामे करण्यासह इतर प्रकारची शहानिशा करण्याची कारवाई १२ तासांपेक्षा अधिक काळ चालली. बुधवारी दुपारी सुरू झालेली कारवाई गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता संपल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कॉल सेंटरचा मालक पसारबेकायदेशीर ऑनलाइन केंद्र चालविणारा जोहेब कुरेशी हा पसार झाला आहे. त्याने या कामासाठी शहरातील तब्बल ५०० पेक्षा अधिक युवकांना तीन शिफ्टमध्ये नोकरीवर ठेवले होते. देशभरातील विविध लोकांना इन्स्टंट लोन घेण्याच्या मोहात पाडून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचा धंदाच याठिकाणी सुरू होता.

काय आहे जामतारा पॅटर्न ?जामतारा हे झारखंड राज्यातील एक छोटे गाव. तेथील युवकांना फसवणुकीचा नवा व्यवसाय सापडला होता. भरपूर कार्ड खरेदी केल्यानंतर बकरे शोधून त्यांना फोन करायचे आणि बँकेचे अकाउंट साफ करायचे ही त्यांच्या गुन्ह्यांची पद्धत. ही सगळी मुलं १८ वर्षांच्या आतील, त्यामुळं कोणाचेही बँकेत अकाउंट नाही. त्यामुळं गावातील एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या नावानं अकाउंट सुरू करायचं आणि त्या खात्यात पैसे जमा करीत राहायचे आणि ते काढूनही घ्यायचे. सायबर पोलिसांनी बराच खटाटोप केल्यानंतर त्यांना जामतारा या गावातून सर्वाधिक फेक कॉल्स येतात व तेथूनच अधिक फसवणुकीचे प्रकार घडतात. हे लक्षात आल्यामुळे जामतारा देशभर ऑनलाइन फसवणुकीसाठी प्रसिद्ध झाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीonlineऑनलाइन