जमाअते इस्लामी हिंदचे आंदोलन
By Admin | Updated: June 16, 2017 23:29 IST2017-06-16T23:26:25+5:302017-06-16T23:29:24+5:30
परभणी : युथ विंग जमाअते इस्लामी हिंदच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १६ जून रोजी आंदोलन करण्यात आले.

जमाअते इस्लामी हिंदचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : देशातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना पाहता बलात्काराचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावेत, यासाठी युथ विंग जमाअते इस्लामी हिंदच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १६ जून रोजी आंदोलन करण्यात आले.
देशातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस यात वाढच होत आहे. गुन्हेगारांना कायद्याचे भय राहिल्याचे दिसत नाही. त्यामुळे गुन्हेगारांचे धैर्य वाढत चालले आहे. या करीता गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, बलात्काराचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावेत, अश्लील साईटवर बंदी घालावी, दारुबंदी करावी या मागणीसाठी जमाअते इस्माली हिंदच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.