जालन्याचा कार्यकाळ सदैव स्मरणात राहिल - देशभ्रतार

By Admin | Updated: April 17, 2015 00:38 IST2015-04-17T00:22:51+5:302015-04-17T00:38:15+5:30

जालना : येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करताना अनेकांचे सहकार्य मिळाले. बालविवाह प्रतिबंधक अभियान राबविण्यासाठी कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला.

Jalna's lifetime will always be remembered - patriotism | जालन्याचा कार्यकाळ सदैव स्मरणात राहिल - देशभ्रतार

जालन्याचा कार्यकाळ सदैव स्मरणात राहिल - देशभ्रतार


जालना : येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करताना अनेकांचे सहकार्य मिळाले. बालविवाह प्रतिबंधक अभियान राबविण्यासाठी कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे जालन्यातील कार्यकाळ सदैव स्मरणात राहिल, असे उदगार मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी काढले.
रत्नागिरी येथे बदली झाल्याने देशभ्रतार यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण समितीच्या वतीने बुधवारी निरोप देण्यात आला. समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधिश रा.वि. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता पाटील, जिल्हा न्यायाधिश ए.एन. करमरकर, अनघा रोट्टे, तदर्थ जिल्हा न्यायाधिश निरंजन नाईकवाडे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.ए. तारेख, जिल्हा सरकारी वकील मुकुंद कोल्हे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव सत्यशिला कटारे, अ‍ॅड. मनोरमा तिडके, अ‍ॅड. कल्पना त्रिभुवन, वैजयंतीमाला मद्दलवार, आर.ए. मुंढे, प्राधिकरणचे अधीक्षक बी.पी. पांचाळ व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. तारेख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा न्यायालयातील वकिल मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: Jalna's lifetime will always be remembered - patriotism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.