जालन्याची गुर्वे महाराष्ट्राच्या संघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:48 IST2019-02-08T00:47:58+5:302019-02-08T00:48:08+5:30

जालना येथील प्रतिभावान महिला क्रिकेटपटू मीना गुर्वे हिची महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड झाली आहे. मीना गुर्वे हिने याआधीही आपल्या मध्यमगती गोलंदाजीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना आपला विशेष ठसा उमटवला आहे.

Jalna's Guaru in Maharashtra's team | जालन्याची गुर्वे महाराष्ट्राच्या संघात

जालन्याची गुर्वे महाराष्ट्राच्या संघात

औरंगाबाद : जालना येथील प्रतिभावान महिला क्रिकेटपटू मीना गुर्वे हिची महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड झाली आहे. मीना गुर्वे हिने याआधीही आपल्या मध्यमगती गोलंदाजीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना आपला विशेष ठसा उमटवला आहे.
महिलांची १९ वर्षांखालील वनडे क्रिकेट स्पर्धेत आसाममधील बोकाखत येथे महाराष्ट्राची पहिली लढत राजस्थानविरुद्ध ११ फेब्रुवारी रोजी दिल्ली, १२ रोजी हिमाचाल, १५ रोजी राजस्थान, १७ केरळ संघाविरुद्ध होत आहे. त्यानंतर आसाममधील जोरहाट येथे महाराष्ट्राचा संघ १९ रोजी कर्नाटक, २३ रोजी आंध्र प्रदेश, २७ रोजी उत्तर प्रदेश आणि एक मार्च रोजी आसाम संघाविरुद्ध दोन हात करील.
मीना गुर्वे हिला एमसीएचे १९ वर्षांखालील निवड समितीचे सदस्य राजू काणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या निवडीबद्दल महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे विभागीय सचिव प्रदीप देशमुख यांनी मीना गुर्वे हिचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Jalna's Guaru in Maharashtra's team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.