जालना पोलीसची मनपावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 01:08 IST2019-02-04T01:07:56+5:302019-02-04T01:08:01+5:30

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत जालना पोलीसने मनपाचा आणि आयजीटीआरने रेव्हेन्यू आणि फॉरेस्ट संघाचा पराभव केला. सतीश श्रीवस आणि दीपक जगताप हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.

Jalna overcome the municipal police | जालना पोलीसची मनपावर मात

जालना पोलीसची मनपावर मात

औरंगाबाद : गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत जालना पोलीसने मनपाचा आणि आयजीटीआरने रेव्हेन्यू आणि फॉरेस्ट संघाचा पराभव केला. सतीश श्रीवस आणि दीपक जगताप हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.
सकाळच्या सत्रात मनपाने प्रथम फलंदाजी करीत २० षटकांत ७ बाद १०१ धावा केल्या. त्यांच्याकडून दीपक जावळेने २७ धावा केल्या. जालना पोलीस संघाकडून सतीश श्रीवसने ३ धावांत ३ गडी बाद केले. बंडू बादुरेने १४ धावांत २ व निरंजन चव्हाणने १ गडी बाद
केला.
प्रत्युत्तरात जालना पोलीसने विजयी लक्ष्य १६.२ षटकांत ७ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून प्रल्हाद बकले याने २४ चेंडूंत ६ चौकारांसह ३७ धावा केल्या. सतीश श्रीवसने १६ व बंडू बादुरेने नाबाद १० धावा केल्या. मनपाकडून रईस अहमद व अल्ताफ यांनी प्रत्येकी २, तर किरण टाकळकरने १ गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात आयजीटीआरने १८.१ षटकांत सर्वबाद १२७ धावा केल्या. त्यांच्याकडून मयूर पाटीलने ३९ धावा केल्या.
रेव्हेन्यू अँड फॉरेस्टकडून राजू नंदकरने २५ धावांत ४ व सय्यद तल्हाने ३३ धावांत ३ गडी बाद केले. आनंद गायके व विठ्ठल गाडेकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात रेव्हेन्यू अँड फॉरेस्टचा संघ १७.४ षटकांत ११७ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून आनंद गायकेने नाबाद ३६ व संतोष राठोडने २० धावा केल्या. आयजीटीआरकडून दीपक जगतापने २२ धावांत ४ व सुशील नाईकने २४ धावांत २ गडी बाद केले. मनोज भाले व अजय पिसे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

Web Title: Jalna overcome the municipal police