जालना नगर पालिकेला आयएसओ-९००२ चे मानांकन
By Admin | Updated: May 13, 2014 01:12 IST2014-05-12T23:27:29+5:302014-05-13T01:12:23+5:30
केवल चौधरी , जालना नियोजनबद्ध विकास कामांची दखल घेऊन मराठवाड्यात जालना नगर पालिकेला आंतरराष्ट्रीय मानांकन आयएसओ-९००२ दर्जा प्राप्त झाला आहे.

जालना नगर पालिकेला आयएसओ-९००२ चे मानांकन
केवल चौधरी , जालना गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात जालना नगर पालिकेने केलेल्या नियोजनबद्ध विकास कामांची दखल घेऊन मराठवाड्यात जालना नगर पालिकेला आंतरराष्ट्रीय मानांकन आयएसओ-९००२ दर्जा प्राप्त झाला आहे. सदरचे प्रमाणपत्र नगर पालिकेला १५ एप्रिल २०१४ रोजीच प्राप्त झाले आहे. जालना नगर पालिकेला हे मानांकन १५ एप्रिल २०१४ ते एप्रिल २०१७ पर्यंत मिळालेले आहे. स्वच्छता, गटार सुविधा, पथदिवे, शिक्षण, पाणीपुरवठा तसेच बगीचा यावर आधारित प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या अहवालानुसार एका समितीने पालिकेच्या कामकाजाची वस्तुनिष्ठ पाहणी केली होती. पाहणी केल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेनंतर आता जालना नगर पालिकेलाही हे मानांकन मिळाले आहे. आता जिल्ह्यातील अन्य काही कार्यालयेही हे मानांकन मिळविण्यासाठी स्पर्धेत उतरणार असल्याचेही समोर आले आहे. मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी सांगितले, नगर पालिकेच्या संपूर्ण कामकाजाची पाहणी करून सदर संस्थेने एक अहवाल तयार केला होता. प्रशासकीय कामकाज व नागरी सुविधा यावर आधारित हे प्रमाणपत्र आहे. वसुलीतही पालिकेने केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. प्रत्येक कामाला वेगवेगळे निकष लावण्यात आलेले आहेत. वीज बिल कमी नगराध्यक्षा पद्मा भरतिया यांनी सांगितले, पालिकेला मिळालेले हे मानांकन म्हणजे गेल्या दोन वर्षांचा कार्यकाळ सुवर्ण अक्षरांनी लिहावा, असे आहे. त्यावर आपण समाधानी असून आपल्या कार्यकाळात जालना शहर खड्डेमुक्त होईल. एवढेच नव्हे तर कमी दाबाच्या दिव्यांचाही वापर करण्यात येत आहे. वीज बिल कमी करून शहर उजळून टाकण्याचा आपला संकल्प आहे.