शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
2
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
3
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
4
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
5
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
6
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
7
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
8
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
10
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
11
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
12
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
13
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
14
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
15
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
16
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
17
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
18
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
20
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
Daily Top 2Weekly Top 5

जालना मतदारसंघ सभांविना सुनासुनाच!

By admin | Updated: October 8, 2014 00:48 IST

संजय कुलकर्णी , जालना निवडणूक रिंंगणातील प्रमुख राजकीय पक्षांच्या तसेच अपक्ष उमेदवारांनी सुद्धा प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शहरात पदयात्रा व रॅलींवर भर दिला आहे.

संजय कुलकर्णी , जालनानिवडणूक रिंंगणातील प्रमुख राजकीय पक्षांच्या तसेच अपक्ष उमेदवारांनी सुद्धा प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शहरात पदयात्रा व रॅलींवर भर दिला आहे. मात्र शहरात एखादा अपवाद वगळता एकाही बड्या नेत्याची सभा आतापर्यंत झालेली नाही. या निवडणुकीत युती आणि आघाडी संपुष्टात आल्याने काँग्रेस, भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील प्रमुख मंडळींची बरीच धावपळ झाली. घटस्थापनेच्या दिवशी हे चारही पक्ष स्वबळावर लढणार, हे स्पष्ट झाले. त्यामुळे या पक्षांमधील प्रमुख नेत्यांच्या सभा घेण्यासाठी राज्यात अनेक मतदारसंघातील उमेदवारांना बरीच कसरत करावी लागली. परिणामी ऐन प्रचाराच्या काळातही प्रचार सभांसाठी प्रमुख नेत्यांची वेळ मिळणे कठीण झाले. जालना शहरात काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी माजी केंद्रीय मंत्री मुकूल वासनिक यांची सभा झाली. शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या प्रचारार्थ संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांची सभा झाली. परंतु या दोन्ही व अन्य उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरात एकाही बड्या नेत्याची सभा अद्याप झालेली नाही. ८ आॅक्टोबर रोजी बसपाचे उमेदवार रशीद पहेलवान यांच्या प्रचारार्थ नेत्या मायावती यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीयमंत्री शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, खा. सुप्रिया सुळे, छगन भूजबळ या नेत्यांच्या सभा जिल्ह्यात काही मतदारसंघात झाल्या. मात्र जालना विधानसभा मतदारसंघात एकाही बड्या नेत्याची सभा मंगळवारपर्यंत झालेली नाही. सहा दिवसांचाच कालावधी राहिल्याने या कालावधीत कोणत्या नेत्यांच्या सभा होतात, याकडे येथील लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)