जालना शहर कॅरीबॅगमुक्त कधी होणार..!
By Admin | Updated: April 25, 2016 23:22 IST2016-04-25T23:10:51+5:302016-04-25T23:22:35+5:30
जालना : राज्य शासनाने महापालिकासह नगरपालिकाक्षेत्रास्त सुध्दा पॉलीबॅग मुक्त व्हावे, अशी अनेकांची इच्छा आहे. परंतु अद्यापही शहरात मोठ्या प्रमाात जमीनीत कुजणार नाहोी

जालना शहर कॅरीबॅगमुक्त कधी होणार..!
जालना : राज्य शासनाने महापालिकासह नगरपालिकाक्षेत्रास्त सुध्दा पॉलीबॅग मुक्त व्हावे, अशी अनेकांची इच्छा आहे. परंतु अद्यापही शहरात मोठ्या प्रमाात जमीनीत कुजणार नाहोी अशा कॅरीबॅगगचा सर्रास वापर सुरू असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे.
राज्य सरकारने २००६ मध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पॉलीथीन बॅगची निर्मिती , विक्री आणि उपयोगावर प्रतिबंध लावण्याचा नियम आहे. परंतु त्याची काही प्रमाणात अंमलबजावणी झाली. परंतु त्यानंतरही छोटे दुकानदार हातगाड्यांवर सामान विकणारे विक्रेते या नियमांचे सर्रास उल्लघन करीत आहेत. ६० टक्क्यांपेक्षा जास्त व्यावसायिक ५० मायक्रॉन्सपेक्षा कमी जाडीच्या कॅरि बॅगमध्ये ग्राहकांना वस्तू देत असल्याचे बाजारात चित्र आहे. याकडे ना नगरपालिकेचे तसेच आरोग्य विभागाचे लक्ष आहे. दोन्ही विभागाच्या दुर्लक्षामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी दुकानदारावर कारवाई तर करतात पण दुसऱ्याच मिनिटाला विक्रेते या नियमांची पायपल्ली करताना दिसून येत आहेत. राज्यात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅग निर्मितीवर प्रतिबंध असतानाही बाजारात एवढ्या मोठ्या प्रमाणात बॅक कुठून येतात , हा गंभीर प्रश्न आहे. कॅरिबॅगवर बंदी घालावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
राज्य प्रदूषण महामंडळाकडून सुध्दा कॅरीबॅग तयार करणाऱ्या उद्योगांवर नियंत्रण नाही. मंडळाच्या उदासिन धोरणामुळे कॅरीबॅग तयार करणाऱ्या उद्योगांवर त्यांचे सुध्दा दुर्लक्ष होत आहे.
४शहरात मोठ्या प्रमाणात कॅरीबॅगचा वापर वाढल्याने दिवसेंदिवस शहराच्या प्रदूषणात वाढच होत आहे. याबाबत वारंवार पर्यावरण प्रेमींकडून जनजागृती करण्यात येते परंतु याकडे सुध्दा प्रशासकीय यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरणाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. कमी जाडीच्या कॅरिबॅगमुळे नाल्या तुंबून स्वच्छतेचा प्रश्न गंभीर होत आहे. कॅरिबॅग जमिनी कुजून प्रदूषण वाढत आहे. उकिरड्यावर पडलेल्या कॅरिबॅगचे सेवन गायी सेवन करत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.