जालन्याचे पाणी पेटले;
By Admin | Updated: December 22, 2014 00:58 IST2014-12-22T00:44:08+5:302014-12-22T00:58:07+5:30
जालना : जायकवाडी-जालना योजनेतून अंबडला पाणी देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय चुकीचा असल्याचा आरोप करून माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी याप्रकरणी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे

जालन्याचे पाणी पेटले;
जालना : जायकवाडी-जालना योजनेतून अंबडला पाणी देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय चुकीचा असल्याचा आरोप करून माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी याप्रकरणी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, शासनाने याप्रकरणी विभागीय आयुक्तांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
पालिकेची बाजू मांडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात हस्तक्षेप करणे बेकादेशीर असल्याचे पटवून देणार आहोत, असे आ. कैलास गोरंट्याल यांनी सांगितले. जायकवाडी योजनेतून पाणी देण्यापूर्वी जालना नगर पालिकेची भूमिका विचारात घेणे गरजेचे आहे.
स्वायत्त संस्थेच्या कारभारात थेट हस्तक्षेप करताना नगरपालिकेला विश्वासात घेणे गरजेचे आहे. हा बेकायदेशीर निर्णय असून स्थानिक परिस्थितीचा विचार करण्यात आला नाही, असेही गोरंट्याल म्हणाले.
गेली ३० वर्ष अंबडला जालन्याने पाणी दिले. शहागड योजनेतून निम्मे पाणी उचलून एकही रूपया खर्च केला नाही. ही योजना अतिशय अडचणी ठरली. त्यामुळे आम्ही सर्वच कायदेशीर बाबी पूर्ण करून जायकवाडीहून पाणी घेतले. त्यात इतर कोणाचाही अधिकार नाही.
पाणी आणण्याच्या आंदोलनात ज्यांचे काहीच योगदान नाही. अशी मंडळी फुकटचे पाणी घेण्यासाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही गोरंट्याल यांनी केला. जालनेकरांची अडचण सोडविताना आलेल्या अडचणींचा उल्लेखही माजी आ. गोरंट्याल यांनी केला.
यावेळी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, सभापती महावीर ढक्का, काँगे्रसचे शहराध्यक्ष अ. हाफीज, डेव्हीड घुमारे, अरूणराव मगरे, शेख माजेदखान, वाजेदखान, ईसाखान पठाण, रहिम तांबोळी, पिंटू रत्नपारखे, महेंद्र अकोले, रवींद्र अकोलकर, अॅड. राहूल हिवराळे, संजय देठे, विनोद यादव, संतोष माधोले आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)४
मंगळवारी मामा चौकात धरणे आंदोलन करून पाणी देण्याचा बेकायदेशीर आदेश फेटाळून लावण्याची मागणी होईल. या योजनेचा खर्च अवाढव्य आहे. पूर्वीच्या योजनेसाठी संपूर्ण खर्च जालना पालिकेला सहन करावा लागला. त्याची पुनरावृत्ती आता होणार नाही. त्यासाठी मंत्रालयात ठरल्यानुसारच पूर्तता करावी लागेल, असे गोरंट्याल यांनी सांगितले.