जालन्यात आयकर विभागाचे आॅईल मिल्सवर छापे!
By Admin | Updated: January 31, 2017 23:38 IST2017-01-31T23:35:32+5:302017-01-31T23:38:37+5:30
जालना : शहरातील सोयाबीनपासून तेल बनविणाऱ्या आॅईल मिल्ससह बाजार समितीतील काही व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांवर कर चुकवेगिरीच्या संशयावरुन आयकर विभागाच्या पथकाने मंगळवारी एकाच वेळी छापे टाकले

जालन्यात आयकर विभागाचे आॅईल मिल्सवर छापे!
जालना : शहरातील सोयाबीनपासून तेल बनविणाऱ्या आॅईल मिल्ससह बाजार समितीतील काही व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांवर कर चुकवेगिरीच्या संशयावरुन आयकर विभागाच्या पथकाने मंगळवारी एकाच वेळी छापे टाकले. रात्री उशिरापर्यंत पथकाकडून कागदपत्रांची तपासणी सुरूच होती. छाप्यातील अधिक तपशील मिळू शकला नाही. या छाप्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.
जालना ही मराठवाड्यातील नावाजलेली बाजारपेठ आहे. येथे मोठ्या प्रमाणावर आॅईलमिल्स आहेत. तसेच सोयाबीनचा व्यापार करणाऱ्या जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडून झालेले व्यवहार या पार्श्वभूमीवर कर चुकवेगिरी झाल्याचा संशय आयकर विभागाला आहे. यावरून आयकर विभागाच्या विविध पथकांनी एकाच वेळी हे छापे टाकले असल्याचे आयकर विभागातील सूत्रांनी सांगितले. छाप्यातील अधिक तपशील मिळू शकला नसला तरी कागदपत्रांची रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरु होती. कादराबादमधील आॅईलमिल, तांदूळवाडी परिसरातील एक कंपनी व बाजार समितीतील १६ ते १७ प्रतिष्ठानांवर पथकाने छापा टाकून संबंधितांची चौकशी केल्याचे समजते.