महापालिकेची जबाबदारी जैस्वाल यांच्याकडे

By Admin | Updated: October 28, 2014 01:03 IST2014-10-28T00:53:18+5:302014-10-28T01:03:04+5:30

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीची जबाबदारी माजी आ. प्रदीप जैस्वाल यांच्यावर देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या गोटातून हाती आली आहे.

Jaiswal has the responsibility of the municipal corporation | महापालिकेची जबाबदारी जैस्वाल यांच्याकडे

महापालिकेची जबाबदारी जैस्वाल यांच्याकडे


औरंगाबाद : महापालिका निवडणुकीची जबाबदारी माजी आ. प्रदीप जैस्वाल यांच्यावर देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या गोटातून हाती आली आहे. जैस्वाल यांच्याकडे सध्या कोणतीही जबाबदारी नाही. त्यामुळे मनपा निवडणुकीत एकहाती सत्ता आणण्यासाठी त्यांना रणनीती ठरविण्यासाठी सांगण्यात आल्याचे कळते.
दोन दिवसांपूर्वी जैस्वाल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पक्षातील कुणी काम केले. कुणी गद्दारी केली. याची माहिती जैस्वाल यांनी ठाकरे यांना दिली. एमआयएमचा विजय होण्यामागे मतांच्या विभाजनाचे गणितही जैस्वाल यांनी ठाकरे यांच्यासमोर मांडले. सर्व बाजूंनी ताकद असतानाही पक्षाचा पराभव झाल्यामुळे पक्षाने मनपा निवडणुकीसाठी जैस्वाल यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याचे निश्चित केले आहे. तसेच विधान परिषद सदस्यपद मिळावे, अशी जैस्वाल समर्थकांची मागणी असून ठाकरे यांच्यापर्यंत ती मागणी लावून धरण्यासाठी एक गट सक्रिय झाला आहे.
जिल्हाप्रमुखपदी दाशरथे
जिल्हाप्रमुखपदी सुहास दाशरथे यांचीच निवड कायम होणार आहेत. सध्या त्यांच्याकडे प्रभारी जबाबदारी देण्यात आली असली तरी यापुढे तेच पदाचे काम पाहणार आहेत. डिसेंबरमध्ये राज्यात संघटनेत मोठे फेरबदल होणार आहेत. त्यात दाशरथे यांची पदनिश्चिती होईल.

Web Title: Jaiswal has the responsibility of the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.