जैन समाजाने सवलतींचा लाभ घ्यावा- पारख
By Admin | Updated: June 29, 2014 00:43 IST2014-06-29T00:37:23+5:302014-06-29T00:43:57+5:30
जालना: जैन समाजांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी अल्पसंख्यांक दर्जाचा लाभ घेतला पाहिजे, असे मत भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांनी व्यक्त केले.

जैन समाजाने सवलतींचा लाभ घ्यावा- पारख
जालना: जैन समाजांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी अल्पसंख्यांक दर्जाचा लाभ घेतला पाहिजे, असे मत भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांनी व्यक्त केले.
भारतीय जैन संघटनेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख व वरिष्ठ पदाधिकरी मार्च महिन्यांपासून परिवर्तन यात्रेद्वारे भारत दौऱ्यावर आहेत. ही यात्रा २५ जून रोजी जालना येथे आली असता, यात्रेचे स्वागत करण्यात आले. जैन भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी हस्तीमल बंब हे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी राष्ट्रीय संयोजक महेश कोठारी, राज्याध्यक्ष पारस ओसवाल, स्थानकवासी समाजाचे महामंत्री आनंद सुराणा, मूर्तीपूजक समाजाचे विनयकुमार आबड, सुरेशचंद मुथ्था, तेरापंथ समाजाचे सुरेशचंद्र सेठिया, दिगंबर जैन समाजाचे जीनदास वायकोस, अकलंब मिश्रीकोटकर, रमेशचंद चोविश्या आदी उपस्थित होते. यावेळी हस्तिमल बंब यांनी संघटनेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. इतर मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अॅड. अभय सेठिया, विजय सुराणा, धनराज जैन, ताराचंद कुचेरिया, नरेंद्र मोदी, विनोद सावजी, पुखराज बंब यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)