शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

जायकवाडी धरणात अर्ध्या टक्क्याने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 1:36 AM

जायकवाडी धरणात मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ७,७५७ क्युसेक क्षमतेने पाण्याची आवक सुरू झाली. सायंकाळी ६ वाजता आवक वाढून १८,१०० एवढी झाली. दरम्यान, अवघ्या तीन तासांत धरणाच्या जलसाठ्यात अर्धा टक्क्याने वाढ झाली. धरणात मंगळवारी सायंकाळी १९.३० टक्के जलसाठा झाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : जायकवाडी धरणात मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ७,७५७ क्युसेक क्षमतेने पाण्याची आवक सुरू झाली. सायंकाळी ६ वाजता आवक वाढून १८,१०० एवढी झाली. दरम्यान, अवघ्या तीन तासांत धरणाच्या जलसाठ्यात अर्धा टक्क्याने वाढ झाली. धरणात मंगळवारी सायंकाळी १९.३० टक्के जलसाठा झाला होता.यंदा जुलै महिना अर्धा संपत आला असतानाही धरणात थेंबभर पाण्याची आवक झालेली नव्हती. यामुळे धरण प्रशासनासह मराठवाड्यातील जनतेच्या नजरा या पाण्याकडे लागल्या होत्या. मंगळवारी धरणात मोठ्या क्षमतेने आवक सुरू झाल्याने मराठवाडाभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून मंगळवारी विसर्ग वाढविण्यात आल्याने जायकवाडीत येणारी आवक मंगळवारी मध्यरात्रीपासून वाढणार असल्याचे उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यात शनिवारपासून संततधार कायम असल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे.सोमवारपासून नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून पाण्याचा विसर्ग करण्यास प्रारंभ करण्यात आला होता. मंगळवारी यात दुपटीने वाढ झाल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे जायकवाडीत येणारी आवक सतत वाढत आहे.पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊसरविवारी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यांत विक्रमी पावसाची नोंद झाली होती. गेल्या २४ तासांत पुन्हा इगतपुरी १४३ मि.मी. व त्र्यंबकेश्वर (पान २ वर)नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळपासून गंगापूर, दारणा, पुणंद व चणकापूर या धरणांतून विसर्ग करण्यास प्रारंभ करण्यात आला होता. मंगळवारी या विसर्गात दुपटीने वाढ करण्यात आली. दारणा धरणातून १०,६०० क्युसेक, तर गंगापूर धरणातून ९,३०२ क्युसेक क्षमतेने आजही विसर्ग कायम ठेवण्यात आला होता. मात्र, नांदूर-मधमेश्वर बंधा-यातून गोदावरी पात्रात होणारा विसर्ग दुप्पट करीत तो २९,५९४ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. यामुळे गोदावरीस पूर आला असून, गतीने हे पाणी जायकवाडी धरणात दाखल होत आहे.तीन तासांतअर्धा टक्का वाढजायकवाडी धरणात आवक सुरू होण्यापूर्वी जलसाठा १८.७९ टक्के एवढा होता. दरम्यान, तीन वाजेस धरणात आवक सुरू झाली व ६ वाजता जलसाठा १९.३० टक्के एवढा झाला होता. धरणात ११.०७१ द.ल.घ.मी. एवढी वाढ नोंदविली गेली.मंगळवारी धरणात एकूण जलसाठा १,१५७.२४० द.ल.घ.मी., तर उपयुक्त जलसाठा ४१९.१३४ एवढा झाला आहे, असे धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे, रमेश चक्रे व श्याम शेळके यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणRainपाऊस