करमाडमध्ये इज्तेमाची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 20:45 IST2019-01-29T20:45:34+5:302019-01-29T20:45:39+5:30
येथे १५ ते १७ फेब्रुवारीदरम्यान जिल्हास्तरीय इज्तेमा होत असून, याची जय्यत तयारी सुरू आहे. या कार्यक्रमास जिल्हाभरातून मुस्लिम बांधव उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

करमाडमध्ये इज्तेमाची जय्यत तयारी
करमाड : येथे १५ ते १७ फेब्रुवारीदरम्यान जिल्हास्तरीय इज्तेमा होत असून, याची जय्यत तयारी सुरू आहे. या कार्यक्रमास जिल्हाभरातून मुस्लिम बांधव उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
करमाड-पिंप्रीराजा मार्गावर गंगासागर लॉन्सच्या मागे जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले आहे. १२ एकरमध्ये सभामंडप टाकण्याचे काम जवळपास पूर्ण होत आहे. त्याचबरोबर भाविकांसाठी शेततळे तयार करण्यात आले असून, हिवरा तलावातून पाईपलाईनद्वारे पाणी आणले जात आहे.
वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी औरंगाबाद-जालना मार्गावरील एक्स्प्रेस लाईनद्वारे पोल टाकून वीजपुरवठा घेण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्था करण्यात येत आहे. प्रमुख नुरोद्दीन अहमद शेख, अध्यक्ष जमीर सय्यद, सचिव गुलाबनबी पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली या ताब्लिगी इज्तेमाचे नियोजन करण्यात येत आहे.