इवल्या इवल्या चिमण्यांचा लागला लळा!
By Admin | Updated: August 25, 2014 01:38 IST2014-08-25T00:41:21+5:302014-08-25T01:38:05+5:30
माधव शिंदे , मसलगा ग्रामीण भागात आजही वडिलधारी मंडळी आपल्या मुलीस पे्रमाने चिमणी शब्दाने हाक देतात़ तेवढेच प्रेम निलंगा तालुक्यातील गौर पाटी येथील शत्रुघ्न खंदाडे यांनी

इवल्या इवल्या चिमण्यांचा लागला लळा!
माधव शिंदे , मसलगा
ग्रामीण भागात आजही वडिलधारी मंडळी आपल्या मुलीस पे्रमाने चिमणी शब्दाने हाक देतात़ तेवढेच प्रेम निलंगा तालुक्यातील गौर पाटी येथील शत्रुघ्न खंदाडे यांनी पक्षी असलेल्या चिमणीवर जोपासले आहे़ त्यामुळे त्यांच्या अंगणात दररोज चिमण्यांचा थवाच विहार करीत असल्याने दिवसभर चिवचिवाट असतो़ विविध रंगांच्या चिमण्या पाहण्यासाठी बालकांचीही गर्दी असते तर ज्येष्ठ मंडळी कुतूहलाने त्यांचे कौतुक करतात़
चिमणी ये, चिव चिव कर, चारा खा, पाणी पी अन् भुरर्रकन उडून जा, असे बोल आपणास लहानपणी ऐकावयास मिळाले आहेत़ लहान बालकांचे मनोरंजन करण्यासाठी चिमणी पाखरांच्या गोष्टी ग्रामीण भागात आजही आजी-आजोबांकडून सांगितल्या जातात़ आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात भ्रमणध्वनी मनोऱ्यांमुळे पक्षांची संख्या घटत चालली आहे़ त्यामुळे चिमणी पाखरंही आता गोष्टीतूनच सांगण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे़
निलंगा तालुक्यातील गौर पाटी येथील शत्रुघ्न खंदाडे यांना गेल्या २७ पेक्षा जास्त वर्षापासून चिमण्यांचा लळा लागला आहे़ ते सकाळी उठल्यानंतर आपल्या अंगणात चिमण्यांसाठी ज्वारीचे दाणे टाकतात़ जवळच चिमण्यांना पाणी पिण्यासाठी छोट्या-छोट्या येळण्याही ठेवल्या आहेत़
याठिकाणी चिमण्यांचे थवे येतात़ अंगणात पडलेले दाणे चिव चिव करीत खातात आणि येळणीतील पाणी पिऊन उडून जातात़ त्यामुळे त्यांच्या घर परिसरातील झाडावर नेहमी चिमण्यांचे थवे असल्याचे पहावयास मिळतात़ या चिमण्या पाहण्यासाठी लहान बालके सकाळपासूनच धावपळ करीत असतात़ तसेच विविध रंगांच्या चिमण्या पाहून कुतूहलही व्यक्त केले जाते़ सध्या पावसाने उघाड दिल्याने पशु-पक्षांना चारा-पाण्यासाठी भटकंती कराव लागत आहे़ परंतू, खंदाडे यांच्यामुळे या भागातील चिमण्यांना सहजरित्या चारा-पाणी मिळत आहे़ चिमण्या कमी झाल्याचे सर्वत्र ऐकावयास मिळते़