शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

आईविना पोरकी दुधावरची ‘साय’ली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 1:13 AM

‘जिणं फाटतंया, तिथंच ओवावा धागा गं... बाई दु:खाच्या कष्टाने लिपाव्या भेगा....’ या ओळी सार्थ ठरविल्या चापानेर येथील एका शिंपी (टेलर) कुटुंबाने. मुलीला गर्भातच संपविण्याची चढाओढ लागल्याचे वारे सध्या वाहते आहे. घरात दोन मुलासह खाणारी चार तोंडे आणि त्यात रोजंदारीची मारामार असतानाही या दिलदार शिंपी कुटुंबाने तीन दिवसाच्या बालिकेस (सायली ऊर्फ संध्या) दत्तक घेऊन तिचे आनंदाने भरणपोषण केले अन् तिचा दुसरा वाढदिवस उत्साहाने साजरा करून मनाचा मोठेपणाही दाखविला.

संतोष सोमासे ।लोकमत न्यूज नेटवर्कचापानेर : ‘जिणं फाटतंया, तिथंच ओवावा धागा गं... बाई दु:खाच्या कष्टाने लिपाव्या भेगा....’ या ओळी सार्थ ठरविल्या चापानेर येथील एका शिंपी (टेलर) कुटुंबाने. मुलीला गर्भातच संपविण्याची चढाओढ लागल्याचे वारे सध्या वाहते आहे. घरात दोन मुलासह खाणारी चार तोंडे आणि त्यात रोजंदारीची मारामार असतानाही या दिलदार शिंपी कुटुंबाने तीन दिवसाच्या बालिकेस (सायली ऊर्फ संध्या) दत्तक घेऊन तिचे आनंदाने भरणपोषण केले अन् तिचा दुसरा वाढदिवस उत्साहाने साजरा करून मनाचा मोठेपणाही दाखविला.जेमतेम १२ वी पर्यंत शिक्षण झालेले विजय उत्तम चव्हाण (वय ३७) चापानेरात टेलरिंग काम करतात. पत्नी व दोन मुलांचे हे चौकोनी कुटुंब. पहिला मुलगा सात तर दुसरा पाच वर्षाचा आहे. १६ वर्षापूर्वी त्यांच्या गव्हाली (तांडा) या गावातून चापानेरात पोटापाण्यासाठी येऊन राहिले. दोनवर्षापूर्वीची ही घटना. चव्हाण कुटुंबिय राजदेहारे (ता. चाळीसगाव जि .जळगाव) येथे पत्नीच्या चुलत बहिणीला मुलगी झाली म्हणून भेटायला गेले. दुर्दैव असे की, बाळंतपणाच्या तिसºया दिवशी ती माता दगावली म्हणून ही तीन दिवसाची बालिका तिच्या वडिलांना नकोशी झाली .चिमुकलीचे वडील प्रकाश रामदास चव्हाण यांना अगोदरच दोन मुली. त्यात पत्नीचे निधन. मग काहींनी या मुलीला अनाथाश्रमात सोडण्याचा सल्ला दिला. हे पाहून विजय चव्हाण यांनी पत्नी वैशालीसोबत चर्चा करून त्या चिमुरडीस दत्तक घेतले व चापानेर येथील घरी आणले .चव्हाण यांचे लहानसे भाड्याचे घर व दुकान. त्यातही चिमुरडी दोन भावात आनंदाने वाढतेय. दर पंधरा दिवसाला ते मुलीला घेऊन लस व डोस देण्यासाठी चापानेरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जातात . तिचा पहिला वाढदिवस मागील महिन्यात थाटात साजरा केला . या कुटुंबाची अर्थिक परिस्थिती बेताचीच. जिद्द ,कष्ट व मेहनतीच्या जोरावर आनंदाने ते संसाराचा गाडा ओढत आहेत.आॅपरेशनसाठीपैशाचीजुळवाजुळवजन्मत: ह्या मुलीच्या डोक्यावर बेंड आहे. त्यावर उपचार सुरु आहेत, मुलगी तीन ते चार वर्षाची झाल्यानंतर आॅपरेशन करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यासाठी २५ ते ३० हजार रुपये खर्च सांगितला आहे. या पैशाची जुळवाजुळव या कुटुंबाने आतापासूनच सुरू केली आहे.अपघातातजीवदान मिळाल्याने केले सत्कार्यविजय चव्हाण हे नऊ वर्षापूर्वी मोठ्या अपघातातून वाचले. आपल्याला देवाने जीवदान दिले मग आपणही कोणाला तरी जीवदान देऊ शकतो, या विचारातून त्यांनी मुलीला दत्तक घेतले आणि तिचा काळजीपूर्वक सांभाळही करत आहेत.