पालिका शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न कायम
By Admin | Updated: May 10, 2014 23:49 IST2014-05-10T23:45:24+5:302014-05-10T23:49:14+5:30
जालना : नगरपालिकेतील शिक्षकांचे डिसेंबर २०१४ पासूनचे वेतन थकित असल्याने शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

पालिका शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न कायम
जालना : नगरपालिकेतील शिक्षकांचे डिसेंबर २०१४ पासूनचे वेतन थकित असल्याने शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. १२ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत प्राथमिक शिक्षक संघाच्या नगर परिषद जालना शाखेतर्फे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, थकित वेतनामुळे १०२ शिक्षक व १५ शिक्षणसेवकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही उपयोग झालेला नाही. जिल्हाधिकार्यांकडे यापूर्वी निवेदन देण्यात आले होते. परंतु जिल्हा प्रशासनाकडूनही काहीच कार्यवाही झाली नसल्याचे त्यात नमूद केले आहे. सध्या सुट्यांचा तसेच लग्नसराईचा काळ असल्याने शिक्षकांना आर्थिक प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. डिसेंबर २०१३, जानेवारी आणि मार्च २०१४ या तीन महिन्यांचे वेतन अद्याप झालेले नाही. फेबु्रवारी २०१४ चेही २० टक्के वेतन अद्याप थकीत आहे. यासह इतर प्रश्नांमुळे १२ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात येत असल्याचे शिक्षक संघाचे अध्यक्ष रवींद्र खिल्लारे, विलास भोईटे, सुरेश सांगुळे, अरूण जायभाये, एम.बी. गोन्टे यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)