मुंबई-लातूर एक्सप्रेस रेल्वेचा वाद चिघळला
By Admin | Updated: April 29, 2017 23:33 IST2017-04-29T23:26:00+5:302017-04-29T23:33:31+5:30
लातूर : मुंबई-लातूर एक्सप्रेस रेल्वेचे बीदरपर्यंत विस्तारीकरण करण्याचा निर्णय रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी लातूर-रेल्वे बचाव कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले़

मुंबई-लातूर एक्सप्रेस रेल्वेचा वाद चिघळला
लातूर : मुंबई-लातूर एक्सप्रेस रेल्वेचे बीदरपर्यंत विस्तारीकरण करण्याचा निर्णय रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शनिवारी गांधी चौकात लातूर-रेल्वे बचाव कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी खा़ सुनिल गायकवाड यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदविला़
मुंबई-लातूर एक्सप्रेस गेल्या दहा वर्षांपासून लातूरकरांच्या सेवेत आहे़ या रेल्वेला लातूरहून दररोज अडीच ते तीन हजार प्रवासी प्रवास करतात़ प्रवासी क्षमतेपेक्षा दीड पट प्रवासी या रेल्वेने दररोज जातात़ ही रेल्वे आता विस्तारीकरणाच्या नावाखाली थेट बीदरपर्यंत नेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे़ मुंबई-लातूर एक्सप्रेस रेल्वेचा वाद आता चिघळला असून, याविरोधात लातूर शहरातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी हा निर्णय हाणून पाडण्यासाठी आंदोलन उभारले आहे़ शनिवारी या आंदोलनाचा भाग म्हणून लातूर रेल्वे बचाव कृती समितीने गांधी चौक येथे आंदोलन करण्यात आले़ यावेळी विविध पक्षांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी व रेल्वे समितीच्या सदस्यांनी भाषणे केली़ (सविस्तर वृत्त/हॅलो २ वर)