साखळी बंधाऱ्यातून औश्यात सिंचन समृद्धी
By Admin | Updated: August 7, 2014 01:40 IST2014-08-07T01:23:53+5:302014-08-07T01:40:39+5:30
औसा : औसा तालुका पावसाळी पाण्यावर अवलंबून आहे़ तालुक्यात जवळपास १०० कोटी रूपये सिंचन प्रकल्प आणि साखळी बंधाऱ्यासाठी आम

साखळी बंधाऱ्यातून औश्यात सिंचन समृद्धी
औसा : औसा तालुका पावसाळी पाण्यावर अवलंबून आहे़ तालुक्यात जवळपास १०० कोटी रूपये सिंचन प्रकल्प आणि साखळी बंधाऱ्यासाठी आमदार बसवराज पाटील यांच्या प्रयत्नामुळे उपलब्ध होऊन खर्च झाले आहे़ यातील बहुतांशी कामे पूर्ण झाली असून, काही प्रगतीपथावर आहेत़ साखळी बंधाऱ्यांमुळे तालुक्यात सिंचन क्षेत्र आणि शेतीला समृद्धी येणार आहे़
औसा तालुक्यात ३४ द्वारयुक्त सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत़ यावर ३ कोटी ५९ लाख ९८ हजार रूपये खर्च झाला आहे़ २६ साखळी बंधाऱ्यासाठी २ कोटी १७ लाख २८ हजार, कृषी विभागाकडून १६ साखळी बंधाऱ्यासाठी १ कोटी ८६ लाख ६० हजार रूपये असे ७६ बंधाऱ्यांसाठी ७ कोटी ६३ लाख ८६ हजार रूपये खर्च झाला आहे़ निलंगा तालुक्यातील १३ द्वारयुक्त सिमेंट बंधाऱ्यांसाठी १ कोटी २८ लाख ९७ हजार, १७ साखळी बंधाऱ्यांसाठी १ कोटी ८६ लाख ६० हजार आणि कृषी विभागाकडील एका सिमेंट बंधाऱ्यासाठी ३० लाख ६२ हजार रूपये, असे ३१ बंधाऱ्यासाठी ३ कोटी ४६ लाख २९ हजार रूपये मंजूर झाले आहेत़
औसा विधानसभा मतदारसंघातील औसा व निलंगा या दोन गावांमध्ये १०७ सिमेंट बंधाऱ्यांसाठी ११ कोटी १० लाख ६ हजार रूपये आमदार बसवराज पाटील यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झाले आहेत़ तेरणा नदीवरील आठ कोल्हापुरी बंधाऱ्याचे बॅरेजेसमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे़ या नुतनीकरणामुळे २८०१ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे़ किल्लारी ते कवठा बंधाऱ्यामुळे १६७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे़ हारेगाव येथे डीपीडीसीअंतर्गत कोल्हापुरी बंधारा बांधकामासाठी ५५ लाख ८२ हजार रूपये मंजूर झाले आहेत़ निलंगा तालुक्यातील उस्तुर्गी येथील बंधाऱ्यासाठी ४३ लाख रूपये खर्च झाला आहे़ या कामामुळे तालुक्यात सिंचनाचे क्षेत्र वाढणार आहे़(वार्ताहर)