आंबेलोहळला लोखंडी रॉडने एकाचे डोके फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:06 IST2021-06-16T04:06:14+5:302021-06-16T04:06:14+5:30

वाळूज महानगर : किरकोळ कारणावरून लोखंडी रॉडने एकाचे डोके फोडल्याची घटना रविवार (दि.१३) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आंबेलोहळ येथे ...

An iron rod smashed the head of one of them | आंबेलोहळला लोखंडी रॉडने एकाचे डोके फोडले

आंबेलोहळला लोखंडी रॉडने एकाचे डोके फोडले

वाळूज महानगर : किरकोळ कारणावरून लोखंडी रॉडने एकाचे डोके फोडल्याची घटना रविवार (दि.१३) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आंबेलोहळ येथे घडली.

याविषयी अधिक माहिती अशी की, राजेंद्र कारभारी प्रधान (३०) हे रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घरात कुटुंबीयांसमवेत जेवण करीत होते. यावेळी राजेंद्र प्रधान यांच्या काकू सुरेखा प्रधान यांच्या घरासमोर शेजारी राहणाऱ्या निर्मला प्रधान यांनी खरकटे पाणी फेकल्याने त्यांना समजावून सांगत होत्या. हा वाद सुरू असताना निर्मला प्रधान व त्यांचे नातेवाईक गणेश प्रधान, विष्णू प्रधान या तिघांनी सुरेखा प्रधान यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या भांडणाचा आवाज ऐकून राजेंद्र प्रधान हे मध्यस्थी करण्यासाठी आले असता, त्यांना धनंजय प्रधान व गणेश प्रधान यांनी हाता-चापटाने मारहाण करण्यात सुरुवात केली. यावेळी संतप्त झालेल्या गणेश प्रधान याने लोखंडी रॉडने राजेंद्र प्रधान याच्या पाठीवर व डोक्यावर मारून त्यांना गंभीर जखमी केले. या मारहाणीनंतर इतरांनी भांडण सोडवत राजेंद्र प्रधान यांची सुटका करून, त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. या मारहाणप्रकरणी राजेंद्र प्रधान यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-----------------------

कामगाराची दुचाकी लांबविली

वाळूज महानगर : कंपनीत कामासाठी गेलेल्या कामगाराची दुचाकी लांबविणाऱ्या अज्ञात चोरट्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंडित चिंतामण पुर्भे (रा.वळदगाव) हग ८ जूनला सकाळी ७ वाजता दुचाकी (क्रमांक एम.एच.२०, बी.एन.०६६६)वर स्वार होऊन, वाळूज एमआयडीसीतील प्रीमिअर इंजिनीअरिंग या कंपनीत कामासाठी गेले होते. कंपनीच्या पार्किंगमध्ये उभी केलेली पंडित पुर्भे यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने संधी साधून चोरून नेली.

------------------------

Web Title: An iron rod smashed the head of one of them