गुंतवणूकदारांचा दबाव अन् एजंटांची घुसमट

By Admin | Updated: May 8, 2015 00:27 IST2015-05-08T00:16:24+5:302015-05-08T00:27:27+5:30

श्रीपाद सिमंतकर , उदगीर एचबीएन कंपनीकडून थकलेल्या रकमा मिळविण्यासाठी गुंतवणूकदार एजंटांवर दबाव वाढवित आहेत़ पोटापाण्यासाठी कमाईचे साधन आणि नातेवाईक

Investors' pressures and agents insinuate | गुंतवणूकदारांचा दबाव अन् एजंटांची घुसमट

गुंतवणूकदारांचा दबाव अन् एजंटांची घुसमट



श्रीपाद सिमंतकर , उदगीर
एचबीएन कंपनीकडून थकलेल्या रकमा मिळविण्यासाठी गुंतवणूकदार एजंटांवर दबाव वाढवित आहेत़ पोटापाण्यासाठी कमाईचे साधन आणि नातेवाईक व मित्रमंडळींना बचत करायला लावणे या चांगल्या उद्देशासाठी एचबीएन कंपनीच्या योजनेत एजंटांनी मेहनतीने पैसे जमा करीत नवीन खातेदार जोडले़
सुरुवातीची काही वर्ष या एजंटांच्या अंतर्गत गुंतवणूकदारांना परतावे देखील प्राप्त झाले़ मात्र गेले जवळपास वर्षभर परतावे रखडल्यामूळे गुंतवणूकदार हातघाईशी आले असून परताव्यासाठी एजंटांकडे जावून दबाव वाढवित आहेत़ अनेक एजंट कार्यालयात ठाण मांडून बसले असून यावर उपाय काय याची चर्चा करीत आहेत़
पोटासाठी केले आणि गळ्याशी आले़़़
एस़ टी़ खात्यातून सेवानिवृत्तीनंतर चरितार्थ चालविण्यासाठी उदगीर येथील जी़ बी़ गरड यांनी एजंट म्हणून उदगीर शाखेत काम सुरु केले़ मोलमजुरी करणाऱ्या लोकांनी ८० रु़ पासून गुंतवणूक सुरु केली़ त्यांचे आज जवळपास ४० ग्राहक आहेत़ परंतू गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या ग्राहकांचा परतावा परत न मिळाल्यामूळे पदरमोड करुन गरीबांच्या गरजा भागविता भागविता त्यांचा खिसा पुरता रिकामा झाला असून ग्राहक अंगावर येण्याचे प्रकार घडत असल्याचे गरड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले़
आम्ही तुमच्याकडे पैसे जमा केले तुम्हीच आमचा परतावा द्या या ग्राहकांच्या प्रश्नापूढे एजंट निरुत्तर होत आहेत़
अनेक एजंटांचे नातेवाईक गुंतवणूकदार आहेत तर अनेक महिला एजंट असून रोज गुंतवणूकदार घरी चकरा मारीत असल्यामूळे संसारातही त्रास होत आहे़
सिमाभागातील मोठी गुंतवणूक या शाखेत आहे़ चांदोरी येथील रामराव नरसप्पा मेहत्रे यांनी आपल्या भावना लोकमतकडे मांडत असताना ग्राहकांचे पैसे मिळालेच पाहिजे यासाठी दिवसरात्र तळमळत असल्याचे सांगितले़ त्यांच्या अंतर्गत १० गुंंतवणूकदारांची खाती चालू आहेत़ बोटावर मोजण्या इतक्या कमिशनसाठी ढिगभर ताण घ्यावा लागत आहे़
४संगारेड्डी शाखेतही अशीच परिस्थिती आहे़ बिदर शाखेतील मात्र परतावे दिल्यामूळे शाखा एचबीएन को आॅपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीत दाखल झाली अशीही चर्चा कार्यालयात ऐकण्यात आली़

Web Title: Investors' pressures and agents insinuate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.