जमीन गहाण, सोने तारण ठेवून केबीसीमध्ये गुंतवणूक

By Admin | Updated: July 19, 2014 00:40 IST2014-07-18T23:41:30+5:302014-07-19T00:40:46+5:30

शिरीष शिंदे, बीड मल्टी लेव्हल मार्केटींग (एमएलएम) स्कीमने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे अनेकवेळा समोर आले असतानाही अनेकांना अल्पावधीत श्रीमंत होण्याचा मोह आवरत नाही.

Investing in KBC by pledging land mortgages, gold | जमीन गहाण, सोने तारण ठेवून केबीसीमध्ये गुंतवणूक

जमीन गहाण, सोने तारण ठेवून केबीसीमध्ये गुंतवणूक

शिरीष शिंदे, बीड
मल्टी लेव्हल मार्केटींग (एमएलएम) स्कीमने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे अनेकवेळा समोर आले असतानाही अनेकांना अल्पावधीत श्रीमंत होण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे नाशिक येथील केबीसी कंपनीत बीड जिल्ह्यातील दहा हजार लोकांनी कोट्यवधीची गुंतवणूक करुन स्व:तच्या पायावर दगड मारुन घेतला. विशेष बाब म्हणजे माजलगाव तालुक्यातील उमरी येथील शेतकऱ्यांनी स्वत:ची जमीन गहाण, सोन तारण ठेवून केबीसीमध्ये गुंतवणूक केली असल्याची धक्कादायकबाब समोर आली आहे.
गुंतवणुकदारांना अल्प मुदतीत पैसे दामदुपट्ट करण्याचे आमिष केबीसी कंपनीने दाखवून बीड जिल्ह्यातील जवळपास हजार लोकांना पन्नास कोटी रूपयांचा गंडा घातल्याची माहिती समोर आल्यानंतर आता हळूहळू गुंतवणूकदारांनी कशा प्रकारे गुंतवणूक केली याची माहिती समोर येऊ लागली आहे. एका व्यक्तीला लाभ मिळाल्यानंतर तो त्याची मार्केटींग करायचा त्यामुळे अनेकांना केबीसीवर विश्वास बसला. उच्च शिक्षित लोकांनी गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांची संख्या वाढतच गेली. केबीसीमध्ये बीड जिल्ह्यातील परळी, धारुर, माजलगाव तालुक्यातील लोकांनी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतविले आहे. केबीसीचे बीड जिल्ह्यात शंभरहून अधिक एजंट असून त्यांच्या मार्फत दहा हजार लोकांनी गुंतवणूक केली असल्याचे सांगण्यात येत आहे. कोेणत्याही एजंटशी संपर्क होऊ शकला नसल्याने गुंतवणूकदारांची ंपूर्ण आकडेवारी समोर येऊ शकली नाही
शेतकऱ्यांनी ठेवली जमीन गहाण
माजलगाव तालुक्यातील पात्रुड व उमरी येथील शेतकऱ्यांनी केबीसीमध्ये गुंतविण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी स्वत:ची जमीन गहाण ठेवली तर काही जणांनी सोने तारण ठेवून. दोन वर्षे सतत पैसे मिळत असल्याने ‘रिफे्रन्स’ पद्धतीचा अवलंब करुन एजंट लोकांनी गुंतवणूकदारांची संख्या वाढवली मात्र शेवटी सर्व सामान्यांना लाखो रुपयांचा चुना लावला गेला.
तक्रारी आल्या नाहीत- रेड्डी
केबीसीमध्ये गुंतवणूक करणारे बीड जिल्ह्यात असतील मात्र कोणत्याही पोलीस ठाण्यात केबीसीविरुद्ध अद्याप तक्रारी दाखल करण्यात आल्या नसल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले
जिल्ह्यातील एजंट नाशिकमध्ये
बीड जिल्ह्यातील केबीसीचे काम करणाऱ्या एजंटची संख्या शंभरहून अधिक आहे. केबीसीमध्ये गुंतवणूकदार वाढल्याने एजंटांची चांगलीच चांदी झाली व त्यांनी अल्प काळात अत्याधुनिक पद्धतीची चार चाकी वाहने खरेदी केली. मात्र आता कंपनीचा घोटाळा उघडकीस अल्याने बीड जिल्ह्यातील एजंटांना त्यांनी वर्षभरापूर्वीच खरेदी केलेली चार चाकी वाहने विक्री काढत असून गुंतवणूकदारांचे पैसे परत देत आहे. काही गुंतवणूकदार नाशिक येथे कंपनी विरुद्ध तक्रार देण्यासाठी जाऊन बसले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

Web Title: Investing in KBC by pledging land mortgages, gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.