खंबाळा येथील दरोड्याचा तपास अद्यापही गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:05 IST2021-07-16T04:05:17+5:302021-07-16T04:05:17+5:30
वैजापूर : तालुक्यातील खंबाळा येथील दरोड्याचा तपास अद्याप गुलदस्त्यात आहे. तोच येथील किराणा दुकान बुधवारी रात्री फोडून चोरट्यांनी पोलिसांना ...

खंबाळा येथील दरोड्याचा तपास अद्यापही गुलदस्त्यात
वैजापूर : तालुक्यातील खंबाळा येथील दरोड्याचा तपास अद्याप गुलदस्त्यात आहे. तोच येथील किराणा दुकान बुधवारी रात्री फोडून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे.
चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांनी खंबाळा येथील शेत वस्तीवर २ जुलैच्या रात्री पती-पत्नीला लाकडाने व धारदार शस्त्राने मारहाण केली होती. यात राजेंद्र गोरसे या युवकाचा मृत्यू झाला. तर त्याची पत्नी मोनिका ही गंभीर जखमी झालेली आहे. या घटनेचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले. पोलिसांनी दोन दिवसांनंतर दोन संशयितांना अटक केली होती. मात्र, त्यांची नावेही अद्याप पोलिसांनी उघड केली नाहीत. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरोड्याचा तपास अद्यापही गुलदस्त्यात आहेत. तर पोलिसांनी संशयित पकडून तपास सुरू असल्याचा दिखावा केला, अशी चर्चा सुरू आहे. तोच बुधवारी (दि.१४) खंबाळा गावात अज्ञात चोरट्यांनी विजय गोरसे यांच्या मालकीच्या दुकानाचे शटर तोड़ून चोरी केली. या चोरीबाबत पोलीस ठाण्यात नोंद झाली नाही. परंतु गावकऱ्यात दहशत निर्माण झाली आहे. तसेच बुधवारी रात्रीच खंबाळा येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या किरतपूर येथे रात्री नऊच्या सुमारास चोर समजून ग्रामस्थांनी समृद्धी महामार्गाच्या कामावरील मजुरांना जबर मारहाण केली. अर्थात नागरिकांत निर्माण झालेल्या भीतीपोटीच हा प्रकार घडला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
150721\img-20210714-wa0025.jpg
खंबाळा येथील चोरट्यांनी शटर उचकटून किरणांना दुकानात चोरी