शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींच्या फसवणुकीचा तपास कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 12:57 IST

crime news २५ लाखांपेक्षा अधिक रकमेच्या फसवणुकीची तक्रार असेल तर अशा प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येतो.

ठळक मुद्दे१२ पैकी केवळ दोन प्रकरणांचा तपास पूर्णदोषारोपपत्र न्यायालयात दाखल

- बापू सोळुंके 

औरंगाबाद : सामान्य नागरिकांची फसवणूक झालेल्या अनेक प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून कासव गतीने होत आहे. यात व्हाइट कॉलर आरोपी असल्यामुळे ते सापडत नाहीत, असा दावा पोलिसांकडून केला जातो. आरोपीच सापडले नसल्यामुळे २०२० मध्ये तपासांवर असलेल्या १२ पैकी केवळ दोन गुन्ह्यांचे दोषारोपपत्र पोलिसांना न्यायालयात सादर करता आले.

२५ लाखांपेक्षा अधिक रकमेच्या फसवणुकीची तक्रार असेल तर अशा प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येतो. पोलीस आयुक्तांची शाखा म्हणून आर्थिक गुन्हे शाखेकडे पाहिले जाते. आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी थेट पोलीस आयुक्ताना रिपोर्टिंग करतात. २०२० मध्ये औरंगाबाद शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपविलेल्या गुन्ह्यांपैकी १२ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक डी. एस. सिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली चार अधिकाऱ्यांची पथके करीत असतात.

मोठ्या रकमेची फसवणूक करणारे आरोपीही व्हाइट कॉलर असतात. अशा आरोपींना अटक करणे, फसवणूक करून मिळविलेल्या पैशांतून आरोपींनी संपत्ती खरेदी केली असेल तर ती संपत्ती जप्त करण्यासाठी शासनाशी पत्रव्यवहार करणे, बॅंक खाती गोठविणे, आरोपींविरुद्ध तपास करून लवकरात लवकर त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे, हे तपास अधिकाऱ्यांचे काम आहे. मात्र आर्थिक गुन्हे शाखेकडून बहुतेक गुन्ह्यांचा तपास कासवगतीने केला जात असल्याचे दिसून येते. गतवर्षी २०२० मध्ये पोलिसांनी केवळ दोन गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. उर्वरित दहा प्रकरणांपैकी एक प्रकरण नोव्हेंबर २०२० मधील आहे. उर्वरित गुन्ह्यातील आरोपींना अटक करणे आणि तपास पूर्ण करून त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल होणे अपेक्षित होते, मात्र झाले नाही.

गतवर्षी गाजलेली प्रकरणे :- २ कोटी २२ लाखांचा गंडा रिदास फायनान्स कंपनीच्या संचालकानी औरंगाबाद शहरातील गुंतवणूकदारांना अल्पावधीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे २ कोटी २२ लाखांचा गंडा घातला. आरोपींनी ना परतावा दिला ना मुद्दल परत केली. यामुळे सुमारे ७५ गुंतवणूकदारानी पोलिसांत धाव घेतली. गुन्हा नोंद झाल्यापासून आरोपी फरार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या आरोपींनी गंगापूर तालुक्यात खरेदी केलेली ६० एकर जमीन पोलिसांनी जप्त केली आहे.

- नासाचे कंत्राट मिळाल्याची थापगतवर्षी जानेवारीत नासाचे कंत्राट मिळाल्याची थाप मारून शहरातील आर्किटेक्टची अडीच कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपावरून नाशिक येथील अभिजित पानसरे, त्याची आई, बहीण आणि शहरातील ॲड. नितीन भवरविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. या केसमध्ये फरार असलेल्या भवरला अकरा महिन्यांनंतर पोलिसांनी अटक केली. या आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र अद्याप दाखल नाही.

- रेल्वे आणि स्काउट-गाइडमध्ये नोकरीचे आमिषरेल्वे आणि स्काउट-गाइडमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनेक बेरोजगार तरुणांना ७० ते ८० लाखांचा गंडा घालणाऱ्या आरोपीला आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. आरोपी सध्या जेलमध्ये आहे. त्याच्यावर लवकर दोषारोपपत्र दाखल होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बनावट धनादेश बॅंकेत वाळूज एमआयडीसीमधील कंपनीचा बनावट धनादेश बॅंकेत टाकून फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारा कथित एनजीओचालक महिला सहा महिन्यांनुसारही पोलिसांना सापडली नाही. या महिलेला अद्याप अटक न झाल्यामुळे तिला हा बनावट धनादेश देणारा कोण? या प्रश्नाचे उत्तर सापडले नाही.

आर्थिक गुन्ह्याचा तपास किचकट असतो इतर गुन्ह्यांच्या तुलनेत आर्थिक गुन्ह्याचा तपास अत्यंत किचकट असतो. या गुन्ह्यात अनेक कायद्यांचा अभ्यास करावा लागतो. तज्ज्ञांचा अभिप्राय घ्यावा लागतो. यामुळे दोषारोपपत्र दाखल करण्यास उशीर होतो. पोलिसांचा तपास न्यायालयात वेळोवेळी सादर केला जातो. कुणाला यात काही शंका वाटत असेल तर येऊन भेटावे. - डॉ. निखिल गुप्ता. पोलीस आयुक्त

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबाद