गणेशचा शाळेतील प्रवेशच नियमबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:59 IST2017-09-01T00:59:35+5:302017-09-01T00:59:35+5:30

अप्पासाहेब मुसळे मतिमंद शाळेतील गणेश गणेश दिनकर घाडगे (१८) या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्यावरून वाद निर्माण झाला होता. माहिती घेतली असता गणेशचा शाळेतील प्रवेशच नियमबाह्य असल्याचे समोर आले

Invalid admission of Ganesh | गणेशचा शाळेतील प्रवेशच नियमबाह्य

गणेशचा शाळेतील प्रवेशच नियमबाह्य

लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा : तालुक्यातील दासखेड येथील कै. अप्पासाहेब मुसळे मतिमंद शाळेतील गणेश गणेश दिनकर घाडगे (१८) या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्यावरून वाद निर्माण झाला होता. माहिती घेतली असता गणेशचा शाळेतील प्रवेशच नियमबाह्य असल्याचे समोर आले आहे. गणेशच्या मृत्यूचे कारण समोर न आल्याने ‘व्हिसेरा’ राखून ठेवण्यात आला आहे.
दिव्यांग किंवा अपंगाच्या शाळेचे शासनाने अंध, मूकबधिर, मतिमंद आणी अस्थिव्यंग असे प्रकार ठरवले आहेत. दासखेडच्या शाळेस मतिमंदचा परवाना देण्यात आलेला आहे. मयत गणेश हा मुका आणि बहिरा असल्याचे पालकांनी सांगितले. हा विद्यार्थी मूकबधिर प्रकारात येतो. असे असताना गणेश यास प्रवेश कसा दिला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Invalid admission of Ganesh