शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

खेळांडूंसाठी पर्वणी! देशातील सर्वात मोठा ऑलिम्पिक दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक छत्रपती संभाजीनगरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 19:21 IST

नोव्हेंबर महिन्यापर्यंत खेळाडूंसाठी होणार उपलब्ध

- जयंत कुलकर्णी

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात प्रतिभावान खेळाडूंची खाण आहे. मात्र, दर्जेदार सुविधांअभावी अनेकांना खेळ सोडावा लागला तर काहींनी दुसऱ्या शहराला पसंती दिली. तथापि, आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ऑलिम्पिक धर्तीवर सिंथेटिक ट्रॅकचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरातूनही आंतरराष्ट्रीय खेळाडू घडण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

२०२३ मध्ये मे महिन्यात सुरुवात झालेल्या सिंथेटिक ट्रॅकचे काम सध्या ६० टक्के पूर्ण झाले असून, याच वर्षी नोव्हेंबरपर्यंत खेळाडूंना सरावासाठी हा सिंथेटिक ट्रॅक उपलब्ध राहील, असा विश्वास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. सचिन देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. विद्यापीठात होणारा हा सिंथेटिक ट्रॅक मराठवाड्यातील पहिला आणि देशातील सर्वांत मोठा असणार आहे.  अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारे प्रशिक्षक सुरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हा ट्रॅक तयार होत आहे. त्यामुळे मराठवाड्यात अनेक दर्जेदार व देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू घडण्याचा मार्ग सुकर होणार आहे. 

केंद्र शासनाच्या ७ कोटी रुपये अनुदानातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होणारा हा सिंथेटिक ट्रॅक ४०० मीटरचा आणि १० लेनचा असणार आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या प्रयत्नातून २०२२ मध्ये सिंथेटिक ट्रॅकसाठी  केंद्र शासनाचे ७ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले होते. मात्र, त्या वेळेस एजन्सी न ठरल्याने हे अनुदान रद्द करण्यात आले होते. मात्र, कुलगुरू विजय फुलारी यांच्या प्रयत्नातून ७ कोटींचे अनुदान मंजूर झाले आणि सिंथेटिक ट्रॅकच्या कामाचा श्रीगणेशा झाला. आतापर्यंत जवळपास ६० टक्के सिंथेटिक ट्रॅकचे काम झाले आहे. 

१० धावणपथ, २४ क्रीडा प्रकार खेळण्याची सोयया मैदानावर ॲथलेटिक्स खेळातील २४ क्रीडा प्रकार खेळण्याची सोय असणार आहे. तसेच चार फूट रुंदींचे एकूण १० धावणपथ या मैदानावर असणार आहे. लांब उडी व तिहेरी उडीसाठीदेखील दर्जेदार दोन मैदाने तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी गुजरात येथून समुद्रातील वाळू मागविण्यात येणार आहे. तसेच थाळीफेक व हातोडाफेकची मैदाने ही जाळीने बंदिस्त असणार आहेत. 

इटलीवरून मागवले स्प्रिंकलर्स उल्लेखनीय बाब म्हणजे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करण्यात आली असून, या पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. या मैदानावर ११० मी. बाय ७३ मी. लांबीचे नॅचरल गवत लावण्यात आले आहे. त्यासाठी इटलीवरून स्प्रिंकलर्स मागवण्यात आले असून २१ मिनिटांत पूर्ण मैदान पाण्याने ओले होणार आहे. या माध्यमातून गवताची निगा व देखभाल होणार आहे. 

ऑलिम्पिक दर्जाचा होणार ट्रॅकपॅरिस ऑलिम्पिकसाठी ज्या कंपनीने ट्रॅक बनवला होता त्याच कंपनीचे साहित्य वापरून सदरचा सिंथेटिक ट्रॅक बनविला जाणार आहे. या ट्रॅकसाठी क्रीडा विभागप्रमुख डॉ. सचिन देशमुख, प्रशिक्षक सुरेंद्र मोदी परिश्रम घेत आहेत.

दर्जेदार खेळाडूंची खाणछत्रपती संभाजीनगरात दर्जेदार खेळाडूंची खाण आहे. ११० व ६० मीटर हर्डल्समध्ये दोन राष्ट्रीय विक्रम स्वत:च्या नावावर असणारा  तसेच याच वर्षी जूनमध्ये तैवान ॲथलेटिक्स स्पर्धेत देशाला सुवर्णपदक जिंकून देणारा तेजस शिरसे, गतवर्षी आंतरविद्यापीठ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी साक्षी चव्हाण, जागतिक शालेय ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी राशी जाखेटे, क्रीडाप्रबोधिनीचा वेगवान धावपटू  ऋषीप्रसाद देसाई यांच्यासारखे अनेक दर्जेदार खेळाडू मराठवाड्यात घडले आहेत. मात्र, सिंथेटिक ट्रॅकची सुविधा नसल्यामुळे तेजस शिरसे व साक्षी चव्हाणला मुंबईला जावे लागले तर राशी जाखेटे हिला खेळ सोडावा लागला. आता विद्यापीठ आणि विभागीय क्रीडा संकुल येथे सिंथेटिक ट्रॅक होणार असल्यामुळे शहर सोडून जाण्याची वेळ प्रतिभावान खेळाडूंवर येणार नाही, असा विश्वास आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरOlympicsऑलिंपिकDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद