कारखान्यातील रेकॉर्ड जप्तीचे निर्देश

By | Updated: November 28, 2020 04:16 IST2020-11-28T04:16:37+5:302020-11-28T04:16:37+5:30

गंगापूर साखर कारखान्यातील गैरव्यवहाराप्रकरणी नुकताच काही संचालक मंडळावर गुन्हा दखल करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून ...

Instructions for confiscation of factory records | कारखान्यातील रेकॉर्ड जप्तीचे निर्देश

कारखान्यातील रेकॉर्ड जप्तीचे निर्देश

गंगापूर साखर कारखान्यातील गैरव्यवहाराप्रकरणी नुकताच काही संचालक मंडळावर गुन्हा दखल करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून कारखान्यातील गैरव्यवहाराची चौकशीची मागणी ऊस उत्पादक शेतकरी कृती समितीने केली होती. यासाठी प्रथम विशेष लेखापरीक्षक वर्ग- एक सहकारी संस्था (साखर) औरंगाबाद यांची याप्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील अंतरिम अहवाल २५ नोव्हेंबरला प्राप्त झाला आहे. कारखान्याचे रेकॉर्ड उपलब्ध करून दिले नाही म्हणून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८० अन्वये रेकॉर्ड जप्त करून चौकशी अधिकाऱ्यास ते उपलब्ध करून देण्याचे निर्देश गंगापूर तहसीलदारांना दिले आहे.

Web Title: Instructions for confiscation of factory records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.